शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
2
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
3
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
4
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
5
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
6
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
7
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
8
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
9
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
10
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
11
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
12
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
13
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
14
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
15
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
16
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
17
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
18
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
19
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
20
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव

गुप्तचर यंत्रणा का अपयशी होतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 12:58 PM

तज्ज्ञ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तवार्ता विभागातील पोस्टिंग म्हणजे ‘साईड ब्रॅन्च’ ही अधिकाऱ्यांची मानसिकता झालेली आहे. पोलीस करिअरमध्ये साईड ब्रॅन्चचे पोस्टिंग केले की नाही, हे देखील पाहिले जाते. त्यामुळे एक पोस्टिंग ‘उरकण्याची’ मानसिकता पोलिसांत दिसते. 

नेपोलियन एकदा म्हणाले होते की, युद्ध जिंकण्यासाठी हजारो सैनिक तैनात करण्याऐवजी जर एक उत्तम गुप्तचर अधिकारी असेल, तर युद्ध होण्याआधीच ते जिंकता येते. तर, अनेक शतकांपासून गुप्तचरांचे महत्त्व असे अबाधित आहे. आता अलीकडच्या काळात महाराष्ट्रात शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला, हिंदुस्थानी भाऊचा पत्ता न लागणे अशा घटनांमुळे गुप्तचर यंत्रणांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणा कशा काम करतात, त्यांना अपयश का येते, या प्रश्नांचा हा सारांश... 

अपयश का येते? -- तज्ज्ञ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तवार्ता विभागातील पोस्टिंग म्हणजे ‘साईड ब्रॅन्च’ ही अधिकाऱ्यांची मानसिकता झालेली आहे. पोलीस करिअरमध्ये साईड ब्रॅन्चचे पोस्टिंग केले की नाही, हे देखील पाहिले जाते. त्यामुळे एक पोस्टिंग ‘उरकण्याची’ मानसिकता पोलिसांत दिसते. - अशा मानसिकतेत असलेले अधिकारी मग गुप्त वार्ता संकलनासाठी आवश्यक टेहेळणी, गुप्त चौकशी, सोंग, बतावणी, शोध अशी तंत्रेच वापरत नाहीत. प्रत्यक्ष फिल्डवर जाणे, लोकांशी संवाद साधणे, स्वतःचे नेटवर्क तयार करणे, या साऱ्याला जवळपास पूर्णविराम मिळाल्याचे दिसते. - अनेक प्रकरणांत केंद्रीय गुप्तवार्ता विभागाकडून येणारी माहिती आणि राज्य गुप्तवार्ता विभागाकडून पुढे येणारी माहिती यांच्यात तफावत दिसते. संवादाअभावी माहिती मिळण्याचे स्त्रोतच तकलादू झाल्यामुळे, मिळालेल्या माहितीची खातरजमाही करणे कठीण होते. - या साऱ्याची परिणती अपुरी, दिशाभूल करणारी माहिती मिळण्यात होते. वास्तविक या विभागाने राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कान, डोळे, नाक असल्याप्रमाणे काम करणे अपेक्षित आहे. इतका महत्त्वाचा हा विभाग आहे. 

गुप्तचर यंत्रणा कसे काम करतात?जमिनीला कान लावता आले, तर जी माहिती मिळेल ती सर्व माहिती मिळविण्याचे प्रामुख्याने काम गुप्तचर यंत्रणांना करावे लागते. राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, जातीय आणि भोवताली घडणारी प्रत्येक घटना समजून, त्याचा अर्थ-अन्वयार्थ लावत कायदा व सुव्यवस्था राखली जाईल, याची काळजी घेणे या यंत्रणेचे सर्वात प्रमुख काम आहे. या यंत्रणेत काम करणाऱ्या लोकांना स्वतःचे माहितीचे स्त्रोत, नेटवर्क उभारावे लागते. अशा नेटवर्कमध्ये रस्त्यावरचा झाडूवाला, दूधवाला, पेपरवाला ते विशिष्ट वर्तुळात काम करणारी लोक अशा अनेकांचा समावेश असतो. भविष्यात काय होऊ शकते, याचा अंदाज बांधत काळजी घेतली जाते. मात्र, सध्या तळागाळात आवश्यक अशा नेटवर्कची कमतरता, संवादाचा अभाव प्रामुख्याने दिसून येतो. 

गुप्तचर यंत्रणांची रचना कशी आहे ? -या सेवेत जेव्हा अधिकाऱ्याचे पोस्टिंग होते, तेव्हा त्याच्या पदातून ‘पोलीस’ हा शब्द वगळला जातो. अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचा अधिकारी राज्य गुप्तवार्ता विभागाचा प्रमुख (आयुक्त) असतो. मुख्यालयात त्या खालोखाल पोलीस महानिरीक्षक दर्जाचा अधिकारी कार्यरत असतो. तसेच चार उपायुक्त असतात. याखेरीज नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोकण, नाशिक अशा रेन्ज कार्यक्षेत्रासाठी एक उपायुक्त असतो. प्रत्येक जिल्ह्यालादेखील एक अतिरिक्त उपायुक्त अधिकारी असतो. गुप्तवार्ता विभागामध्ये व्हीआयपी सुरक्षा, नक्षल, विद्यार्थी, कामगार, शेतकरी, राजकीय, सामाजिक, महिला अशा विविध घटकांची माहिती घेणारे उपविभाग आहेत. कानाकोपऱ्यांतून मिळणारी ही माहिती राज्य गुप्त वार्ता प्रमुखांमार्फत रोजच्या रोज मुख्यमंत्री, गृहमंत्री, गृहसचिव यांना दिली जाते.  - विशेष प्रतिनिधी 

टॅग्स :PoliceपोलिसIndiaभारतGovernmentसरकार