शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जनमन: दहीहंडीच्या उत्सवाला खेळाचा दर्जा देणे हानिकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 07:55 IST

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी गोविंदा पथकाला खेळाचा दर्जा देऊन टाकला आहे. भारतीय समाजामध्ये उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी गोविंदा पथकाला खेळाचा दर्जा देऊन टाकला आहे. भारतीय समाजामध्ये उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तो भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. मात्र, सार्वजनिक किंवा धार्मिक उत्सव याला खेळाचा दर्जा देणे, त्यामध्ये पाच टक्के आरक्षणाची घोषणा करणे ही गोष्ट क्रीडा क्षेत्रासाठी हानिकारक आहे.

१) कोणत्याही खेळाचे सामने आयोजित करण्यासाठी त्या संघटनेचे कामकाज किमान १२ जिल्ह्यांत असणे आवश्यक आहे.२) महाराष्ट्र राज्य शासनाच्या क्रीडा प्रकारात आंतरशालेय सामन्यांमध्ये १४, १७ आणि १९ वर्षाखालील मुला-मुलींचे संघ असतात. विद्यापीठ स्तरावरील सामन्यांसाठी वयाची अट २५ आहे.३) गोविंदा खेळामध्ये खालच्या दोन मनोऱ्यांमध्ये २५ ते ३५ वर्षांचे गोविंदा उभे राहतात. त्यानंतर तिसरा, चौथा थर चढविला जातो. यामध्ये वेगवेगळ्या वयाचे खेळाडू सहभागी होतात.  अशा स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय किंवा तृतीय क्रमांक कशाच्या आधारावर काढले जातील? गुजरातसह संपूर्ण देशामध्ये गरबा हा सांस्कृतिक खेळ खेळला जातो. पुढे जाऊन गरबा या खेळाचा समावेशही क्रीडा क्षेत्रात करणार का? गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात ढोल वाजविण्यात येतात. ढोल वाजविण्याच्या प्रकाराला भविष्यात क्रीडा प्रकाराचा दर्जा देणे योग्य ठरेल का? ग्रामीण भागात श्रावण महिन्यात टिपऱ्या हा खेळ खेळला जातो. याला आपण बोली भाषेत खेळ म्हणतो. शासनाच्या क्रीडा धोरणामध्ये उत्सव आणि खेळ यामध्ये फरक करणे आवश्यक आहे.४) मुंबई उच्च न्यायालयाने १४ वर्षाखालील गोविंदांना चौथ्या मनोऱ्यावर चढण्यास बंदी घातली आहे.५) सर्वच राजकीय पक्षांनी उत्सवाला इव्हेंटचे स्वरूप दिलेले आहे. यामुळे उत्सव कमी आणि प्रदर्शन, प्रचार जास्त असेच चालले  आहे. राजकीय पक्षांना आपली व्होट बँक मजबूत करण्यासाठी असे प्रयत्न करावेच लागतात. कोणत्याही धार्मिक किंवा सांस्कृतिक उत्सवाला विरोध असण्याचे कारण नाही. मात्र, त्याला खेळाचा दर्जा देणे चुकीचे वाटते.

- प्रशांत साठे, औरंगाबाद(या आशयाची पत्रे शंभू रोकडे, दत्तप्रसाद शिरोडकर, टिळक  उमाजी खाडे यांच्यासह अनेक वाचकांनी पाठवली आहेत.)

टॅग्स :Dahi Handiदहीहंडी