शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

भुकेपोटी चोरी

By admin | Updated: February 6, 2016 15:17 IST

काहीही डाउनलोड करायची गरज नाही, आणि कसलीही अपराधी भावना नाही. याचा आनंद काय असतो, ते - नाइलाजापोटी का असेना, पायरसी केलेल्यांनाच कळू शकेल.

अमोल परचुरे
 
 
डोबिवलीतलं टिळक टॉकीज.. सुटीमध्ये ग्रँट रोडमधली सगळी थिएटर्स.. चाळीच्या मालकानं आणलेल्या व्हीसीआरवर रात्रभर जागून अधाशासारखे बघितलेले पाप की दुनिया, प्यार एक मंदिर सारखे सिनेमे..
सिनेमांचं व्यसन तसं लहानपणापासूनच लागलेलं आणि सिनेमांची भूक भागवण्यासाठी माध्यमंही सतत बदलत गेलेली. 
व्हीसीआरनंतर आले केबल चॅनेल.. रोज दुपारी आणि रात्री केबलवाला कोणता सिनेमा लावणार याचा सस्पेन्स असायचा. स्थानिक जाहिरातींमध्ये जवळपास अर्धा स्क्रीन जरी झाकला जात असला तरी त्याची पर्वा नसायची. साधारण त्याच काळात डीडीवर दर रविवारी दुपारी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सिनेमे बघण्याची सवय लागली. कोणत्याही भाषेतला सिनेमा असला तरी सबटायटल्समुळे आशय कळतो, याची पहिल्यांदा जाणीव याच सिनेमांनी दिली. वृत्तपत्रीय समीक्षा वाचून सिनेमांची गोडी आणि सिनेमा तंत्रची जाणीव वाढायला लागली. दक्षिण मुंबईतल्या थिएटर्समध्ये जाऊन टायटॅनिक सारखे सिनेमे बघणंही सुरू झालं. टीव्हीवर मूव्ही चॅनेल्स आल्यावरसुद्धा चांगल्या, दर्जेदार सिनेमांचा आस्वाद घेण्यासाठी मोठा पडदाच हवाहवासा वाटत राहिला. सिनेमा लायब्ररी लावून जागतिक सिनेमे पाहण्याचा प्रयत्नही झाला. पण लायब्ररीच्या माणसाची आणि माझी चुकामूक व्हायला लागली आणि मग तेही मागे पडलं. 
माझं सिनेमाचं जग आणखी व्यापक झालं ते माझी बायको आणि पाँडिचेरीमुळे.. जागतिक सिनेमांची माहिती माङयापेक्षा माङया बायकोला कितीतरी जास्त. त्यामुळे पॉडिचेरीचं डीव्हीडी मार्केट आम्ही अक्षरश: लुटलं. केवळ शंभर रुपयात एका डीव्हीडीत तीस गाजलेले फ्रेंच सिनेमे ही तर मेजवानीच होती. हा सिनेमांचा खजिना नंतर बरेच महिने पुरला. 
त्याच दरम्यान टोरण्टबद्दल ऐकायला येत होतं. रात्रभर सिनेमा डाउनलोडला लावून ठेवायचा हा उद्योग मला कधी जमला नाही, पण सुदैवाने हा प्रपंच करणारे अनेक मित्र मिळाले. पेनड्राइव्ह 
आणि हार्डडिस्कमुळे हे सिनेमे स्वत:कडे घेऊन साठवणं हेसुद्धा तसं सोपं होतं. टोरण्टच्या अडचणी ब:याच होत्या. नव्याको:या प्रकाशित झालेल्या पुस्तकाची कॉपी विकणारी मुलं तुम्ही सिग्नलवर बघितली असतील. ती पुस्तकं डुप्लिकेट असतात हे आपल्याला माहीत असतं. टोरण्ट हा त्यातलाच प्रकार. अस्सल नाही तर ब:याचदा नक्कल, पिक्चर क्वालिटी चांगली असेलच याची खात्री नाही, सब टायटल्स फाइल गूगलवर शोधायची, डाउनलोड करायची. मित्रंकडून घेतलेले सिनेमे साठवून ठेवण्यासाठी हार्डड्राइव्ह खरेदी करायचे, आणि ते खराब होणार नाहीत याची काळजी घ्यायची. सगळा चोरीचा मामला असल्यामुळे तक्र ारही करू शकत नाही, आणि आपण पायरसीला हातभार लावतोय याची जाणीव टोचत असतेच.
मग पुन्हा मोर्चा वळला मूव्ही चॅनेलकडे. इंग्लिश मूव्ही चॅनेल्सनी त्याबाबतीत बरीच मेहनत घेतली. आपल्याकडे रिलीज न झालेले सिनेमेसुद्धा त्यांनी दाखवायला सुरुवात केली, पण तरीही ज्या प्रमाणात वल्र्ड सिनेमा पोचायला हवा होता तेवढा पोचलेला नाही. 
मुंबई, पुणो, गोवा वगैरे फिल्म फेस्टिव्हल्स गाठणं प्रत्येकवेळी शक्य होतंच असं नाही. 
यामुळेच नेटफ्लिक्ससारख्या ऑनलाइन स्ट्रिमिंग सव्र्हिसेसची सोय माङयासारख्या वेडय़ांसाठी केवढी तरी उपकारक आहे. लॅपटॉप किंवा मोबाइल, दोन्हीपैकी कशावरही आता मी माङया सोयीने सिनेमे बघू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे विक्रमी यश मिळवलेल्या टीव्ही सिरीज बघण्याचं भाग्य या सव्र्हिसेसमुळे मिळेल, ते वेगळंच. 
..काहीही डाउनलोड करायची गरज नाही, आणि कसलीही अपराधी भावना नाही. 
- याचा आनंद काय असतो, ते - नाइलाजापोटी का असेना - पायरसी केलेल्यांनाच कळू शकेल.
 
ऑनलाइन स्ट्रिमिंग सव्र्हिसेस नामक घरपोच चंगळीचा खजिना खुला करणा:या सेवांबद्दलचा गणोश मतकरी यांचा लेख गेल्या रविवारी प्रसिद्ध झाला.
मनोरंजनाच्या दुनियेचे फासे पलटवणा:या या नव्या खिडक्या उघडत असताना, जुने सिनेमे डाउनलोड करण्यासाठी रात्ररात्र टोरण्ट्सवर पडीक असलेल्या जातीच्या ‘पायरेट’ना त्या जुन्या दिवसांची (आणि रात्रींची, ओसंडून वाहणा:या हार्डडिस्कची, ‘माला’च्या देवाण-घेवाणीसाठी वापरायच्या पेन ड्राइव्हजची) आठवण येणं तसं स्वाभाविकच!
..त्यातलीच ही एक आठवण!
 
(लेखक आयबीएन-लोकमत या वृत्तवाहिनीत वृत्तसंपादक आणि चित्रपट समीक्षक आहेत)