शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

वरवरचे एकेरी दिसणाऱ्या माणसांच्या आत दडलेली माणसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 5:22 PM

ललित : आपल्या जीवनप्रवासात असंख्य माणसं भेटतात. काही माणसे रेतीवरील अक्षराप्रमाणे येतात आणि कालांतराने तशीच लाटेबरोबर विसरूनही जातात. काही त्या खडकासारखी वर्षानुवर्षे एखाद्या घटनेची साक्ष देत राहतात. अशा अनेक व्यक्तींच्या सहवासाने आपले आयुष्य घडत राहते. साहजिकच आपण त्यांना ओळखतो असे म्हणतो. थोडक्यात काय तर ती माणसं आपल्याला कळतात. असे आपण धरून चालतो.

- सुषमा सांगळे-वनवे

माणूस कळणे म्हणजे नेमके काय? प्रत्येकाची कल्पना वेगळी असावी. एखाद्याची नोकरी, त्याची मुलेबाळे, त्याची चेहरेपट्टी आणि एकंदर त्याचे समाजातील स्थान कळले की, तो माणूस कळला अशी आपली समजूत होते. हे झाले इतरांच्या बाबतीत पण आपण स्वत:चे स्वत:ला तरी कुठे कळलेलो असतो? आपल्याच स्वभावातील कानेकोपरे, चित्रविचित्रपणा, इंद्रधनुसमान अचानकच उमटणाऱ्या विविध रंगी छटा याची कशाचीच आपल्याला कल्पना नसते. तरीही भासमान क्षितिजासारखे आपण उगीच मी अशी, मी तशी, असे म्हणत असतो.

बऱ्याचवेळा आपण एखादी कृती करून जातो आणि पुन्हा अगदी सहज म्हणतो ही 'माझी अक्कल कुठे मातीत गेली होती देव जाणे', ' मी हा गाढवपणा करून मोठी चूक केली'याचाच अर्थ आपली आपल्याला ही ओळख पटलेली नसते.विशिष्ट वेळी आपण कसे वागू, एखाद्या प्रसंगी आपल्या कोणत्या प्रतिक्रिया येतील याचा कशाचाच आपल्याला अंदाज नसतो. ज्यांना आपण वर्षानुवर्षे पाहतो, त्याच्या स्वभावाची खात्री देतो अशी एखादी व्यक्ती भलतेच कृत्य करते. त्यावेळी आपण सहज म्हणूनही जातो. ‘स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते’  'या गोष्टीवर विश्वासच बसत नाही ना.? याचे कारण म्हणजे ओळखीच्या माणसांना सुद्धा आपण पुरेसे ओळ्खलेलो नसतो.

एक घटना आठवली म्हणून सांगते.माझा एक विद्यार्थी  अगदी शांत, मितभाषी स्वभावाचा आणि तेवढाच हुशार ही. दिसायला अगदी साधारण.मुळातच मितभाषी असल्यामुळे तसा तो कोणाशी जास्त बोलत ही नसायचा.त्याचे आईबाबा ही कायम त्याचे कौतुक करायचे. इतर मुलांसारखा टवाळखोर, उनाडपणा त्याच्याकडे कधीच नव्हता. त्याची स्वप्नेही अगदी मोठा आॅफिसर बनण्याची होती. बऱ्याच वर्षांनी त्याची व माझी अचानक बसस्टँडवर भेट झाली. मी दिसल्याबरोबर तो स्वत:च माझ्याकडे आला. आणि 'कशा आहात?' असे अदबीने विचारलेही. मी बरी आहे. असे म्हणत त्याच्यासोबत असलेल्या गोरीगोमट्या मुलीबाबत 'ही कोण?' म्हणून विचारणा केली 'माझी बायको आहे, गेल्या महिन्यातच आम्ही लव्हमॅरेज केले.' या उत्तराने मी पुरती अवाक झाले. एवढा शांत,आणि मितभाषी मुलाने एवढी गोरीगोमटी सुंदर मुलगी कशी काय पटवली असेल, या विचारात नुसती गोंधळून गेले. मनात विचार आले आपण कल्पना करत होतो त्यापेक्षा हा मुलगा किती वेगळा होता.त्याच्यात एवढे डेअरिंग कुठून आले असेल? माणसाच्या आत पुन्हा वेगळी माणसे दडलेली असतील का?

आणखी एक उदाहरण म्हणजे माझा क्लासमेट ज्याला मी लहानपणापासून पुरती ओळखायचे. दहावीत नापास झाला म्हणून वडिलांनी बाहेर काढलेले ही होते. शाळेची त्याला मुळी आवडच नव्हती स्वभावाने अगदी हट्टी आणि उनाड असणारा. आई वडिलांनी त्याच्या शिक्षणाची आशाच सोडून दिली होती.  नंतर खूप वर्षे आमचा कांही संपर्कच नव्हता.बऱ्याच वर्षांनी त्याची आई मला रस्त्यात दिसली मी खूप मोठ्या आपुलकीने विचारले. ‘आमचा मित्र काय करतो’ तिने अगदी सहज उत्तर दिले 'अमेरिकेत आहे', 'हा काय त्याचा बंगला' अत्याधुनिक पद्धधतीने बांधलेले करोडो रुपयांचे त्याचे घर पाहून क्षणभर मी स्तिमित झाले. मनात विचार आले. या उनाड, बेपर्वा मुलामध्ये कर्तबगार, महत्त्वाकांक्षी, गुणी मुलगा कुठे लपून बसला होता. आणि त्याच्या या गुणांचा मला थांगपत्ताही कसा लागला नाही.आपले सर्वांचे व्यक्तिमत्त्व एकंदर पाहता वरवरचे, दिखाव्याचे तर नसेल कशावरून? अशा वरवरचे एकेरी दिसणाऱ्या माणसांच्या आत आणखी किती माणसे दडलेली असतील कोण जाणे?

टॅग्स :Socialसामाजिकliteratureसाहित्य