शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

Investment: प्रथमच गुंतवणूक करताय? मग या टिप्स वाचाच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 11:34 IST

Investment: पैसे नेमके कोणत्या कोणत्या योजनांमध्ये गुंतवावेत, जास्तीत जास्त रिटर्न देणाऱ्या योजना कोणत्या आहेत तसेच कमी कालावधीत अधिक नफा कसा मिळवावा याची त्यांना माहिती नसते. त्यामुळे तुम्ही प्रथमच गुंतवणूक करत असाल तर या काही टिप्स...

- चंद्रकांत दडस, उपसंपादकअनेक जण गुंतवणुकीच्या पहिल्या टप्य्यात गोंधळून जातात. पैसे नेमके कोणत्या कोणत्या योजनांमध्ये गुंतवावेत, जास्तीत जास्त रिटर्न देणाऱ्या योजना कोणत्या आहेत तसेच कमी कालावधीत अधिक नफा कसा मिळवावा याची त्यांना माहिती नसते. त्यामुळे तुम्ही प्रथमच गुंतवणूक करत असाल तर या काही टिप्स...गुंतवणूक योजना बनवापैसे गुंतवायचे आहेत असे तुमच्या मनात आल्यानंतर तुम्हाला त्यासाठी एक योजना तयार करावी लागेल. मी किती गुंतवणूक करू शकतो? मी काय गमावू शकतो? माझे गुंतवणुकीचे ध्येय काय आहे? ते ध्येय गाठण्यासाठी मी किती काळ गुंतवणूक करत राहणार आहे? हे प्रश्न स्वत:ला विचारून गुंतवणुकीला सुरुवात करा.किती रिस्क घेऊ शकता? तुम्ही किती रिस्क घेऊ शकता हे समजून घ्या आणि गुंतवलेले काही किंवा सर्व पैसे गमावल्यास तुम्हाला कसे वाटेल याचाही विचार करा. प्रथमच गुंतवणूक करणारे सामान्यपणे एक चूक करतात ती म्हणजे नुकसानीची भीती ते घेतात. मात्र लक्षात ठेवा, तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत रिस्क असते. रिस्क घेतली तर फायदेही मिळतात.विविध ठिकाणी गुंतवणूक? केवळ विशिष्ट बाजारपेठांमध्ये, क्षेत्रांमध्ये किंवा कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याने नुकसान होऊ शकते. त्याऐवजी अनेक मालमत्ता निर्माण करणाऱ्या क्षेत्रात गुंतवणूक केल्याने संभाव्य तोटा कमी करण्यात आणि दीर्घकालीन परतावा वाढवण्यास मदत होते.सतत गुंतवणूक वाढवाएकरकमी गुंतवणूक करण्यापेक्षा थोडी थोडी गुंतवणूक करणे कधीही फायदेशीर ठरते.  त्यातून रक्कम हळूहळू वाढत जाते आणि धोकाही कमी राहतो. बाजारातील चढउतार लक्षात घेत कमी वयात आणि नियमितपणे गुंतवणूक सुरू करून तुम्ही श्रीमंत होण्याकडे वाटचाल करू शकता. यात तुम्हाला लाखांचे कोटी कधी झाले हे कळणारदेखील नाही. मात्र त्यासाठी ध्येय आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचे ध्येय ठेवा. तुम्ही गुंतवणूक सुरू केल्यानंतर त्यातून फायदा नक्की मिळतो. तो फायदा पुन्हा एकदा गुंतवणुकीसाठी वापरा. त्यामुळे खात्यातील रक्कम गतीने वाढलेली पहायला मिळेल.तुमच्या योजनेवर ठाम राहाजेव्हा पहिल्यांदा गुंतवणूक करायला सुरुवात कराल तेव्हा लक्षात येईल की बाजारातील चढउतार, महागाई, व्याजदर, लाभांश, सोन्याची किंमत, तेलाच्या किमती या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे फार कठीण आहे. त्यामुळे या सर्व बाबींवर सतत लक्ष द्यायला हवे. तुमची गुंतवणूक शक्यतो दीर्घकालीन असावी, त्यातून चांगले रिटर्न मिळतील या शक्यतेने संबंधित क्षेत्रात गुंतवणूक करा.

टॅग्स :InvestmentगुंतवणूकMONEYपैसा