शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
PM मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांना गिफ्ट केले 'मेलोडी चॉकलेट्स'! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
घरगुती क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
5
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
6
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
7
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
8
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
9
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
10
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
11
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
12
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
13
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
14
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
15
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
16
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
17
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
18
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
Daily Top 2Weekly Top 5

युद्धात ज्याच्याकडे दमदार टेक्नॉलॉजी तो ठरणार भारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 12:53 IST

War News: युक्रेनने गेल्या रविवारी ऑपरेशन ‘स्पायडर वेब’ राबवून त्यांच्या ११७ ड्रोनद्वारे रशियाच्या हवाई दलाच्या तळांवर हल्ला चढवला, ज्यामध्ये अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असलेल्या लांब पल्ल्याच्या बॉम्बर्सना लक्ष्य केले गेले.

- डॉ. सुखदेव उंदरे
युक्रेनने गेल्या रविवारी ऑपरेशन ‘स्पायडर वेब’ राबवून त्यांच्या ११७ ड्रोनद्वारे रशियाच्या हवाई दलाच्या तळांवर हल्ला चढवला, ज्यामध्ये अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असलेल्या लांब पल्ल्याच्या बॉम्बर्सना लक्ष्य केले गेले. हा हल्ला रशियाच्या सुरक्षा व्यवस्थेचे अपयश आहे. हल्ल्यानंतर मुरमान्स्क, इरकुत्स्क, इवानोजो, रियाजान आणि अमूर या पाच लष्करीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी युक्रेनी ड्रोन हल्ले झाल्याची पुष्टी रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केली. पण यापैकी केवळ मुरमान्स्क आणि इरकुत्स्कमध्येच विमानांचे नुकसान झाले असून इतर ठिकाणचे हल्ले हाणून पाडण्यात आल्याचा दावा रशियाने केला आहे. परंतु त्याचबरोबर रशिया या हल्ल्याचा बदला घेणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावर वक्तव्य केले आहे. बदला घेणार असे पुतिन यांनीच आपल्याला टेलिफोनवर सांगितले असल्याचा ट्रम्प यांनी दावा केला आहे. तेव्हा रशिया-युक्रेन युद्ध अजून पुढच्या टोकाला जाणार असल्याचे संकेत मिळताहेत.   युक्रेनच्या या ऑपरेशन ‘स्पायडर वेब’ने परंपरागतच नव्हे तर आधुनिक युद्धाचीही परिभाषा बदलली आहे.

‘स्मार्ट शस्त्रांनीच’ होतील युद्धे 
युक्रेनच्या या ऑपरेशनने अल्प खर्चाने तयार केलेली ओपन सोर्स ड्रोन प्रणाली अरबों रुपये खर्च करून तयार केलेल्या सुरक्षा उपकरणांनादेखील नष्ट करू शकते  हे स्पष्ट केले. 
युक्रेनने या हल्ल्यासाठी ज्या ड्रोन्सचा वापर केला, त्याची बाह्यरचना हेलिकॉप्टरसारखी असून त्यांना ‘क्वॉड कॉप्टर’ म्हटले जाते. 
या पुढील काळात आता युद्धे ही ‘मिसाईल  टँकर’ नव्हे तर ‘स्मार्ट शस्त्रांनीच’ निर्णायक ठरतील हे वास्तव आहे.त्यामुळे देशांना आता शांतीच्या नव्हे तर युद्धाची नवी तंत्रे व नव्या वाटा चोखाळाव्या लागतील. 

फायबर ऑप्टिक ड्रोन : युद्धाचे धोकादायक अस्त्र
सैनिकांना नवीन तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांना लवकर प्रतिसाद देणे आवश्यक आहे. सध्याचा असाच नवीन धोका म्हणजे फायबर ऑप्टिक ड्रोन. ड्रोनच्या तळाशी दहा किलोमीटरच्या केबलचा स्पूल बसवला जातो आणि त्या फिजिकल फायबर ऑप्टिक कॉर्डला पायलटच्या हातातील कंट्रोलरशी जोडले जाते.
व्हिडीओ आणि कंट्रोल सिग्नल रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून नाही तर केबलद्वारे ड्रोनकडे पाठवले जातात. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक इंटरसेप्टर्सने त्याला जॅम करता येत नाही. 
या युद्धात दोन्हीकडच्या सैन्यांनी त्यांच्या वाहनांवर इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली (वॉरफेअर) बसवल्या होत्या. त्या ड्रोन निष्क्रिय करू शकत होत्या. मात्र, फायबर ऑप्टिक
ड्रोनच्या आगमनाने ती सुरक्षा संपुष्टात आली आहे. 

भारताची ड्रोनसुरक्षा सज्जता कुठवर? 
काही दिवसांपूर्वी भारतीय वायुसेनाप्रमुख एयर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह यांनी संरक्षण खरेदी प्रकल्पांना होत असणाऱ्या दिरंगाईवर नाराजी व्यक्त केली. 
भारताच्या ड्रोन मिशनमध्ये पहिल्यापेक्षा थोडी सुधारणा झाली असली तरी जगातील उच्च तंत्रज्ञातील स्पर्धेत मात्र भारत नाही, ह्याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा.

टॅग्स :warयुद्धrussiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया