शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

घर ते पाठीशी हवंच!

By admin | Updated: April 9, 2016 14:53 IST

आत्महत्त्या- मग ती एखाद्या फेमस स्टारची असो नाहीतर कुणाला माहिती नसलेल्या कुण्या सामान्य स्त्री-पुरुषाची, ती एक दुर्दैवी घटना असते. आणि ती व्यक्ती त्या निर्णयार्पयत का पोचली असावी या प्रश्नाचं उत्तरही सरळ-साधं नसतं.

एकटय़ाचा-एकटीचा टिकाव लागणं मुश्कीलच!
 
सोनाली कुलकर्णी
 
आत्महत्त्या- मग ती एखाद्या फेमस स्टारची असो नाहीतर कुणाला माहिती नसलेल्या कुण्या सामान्य स्त्री-पुरुषाची, ती एक दुर्दैवी घटना असते. आणि ती व्यक्ती त्या निर्णयार्पयत का पोचली असावी या प्रश्नाचं उत्तरही सरळ-साधं नसतं. प्रत्युषा माङया क्षेत्रतली होती, तरीही तिने इतकं टोक का गाठलं असावं, याच्या कारणांची छातीठोक खात्री देणं मला चुकीचं आणि असंवेदनशील, असभ्यच वाटतं. त्या एका घटनेने अख्ख्या इंडस्ट्रीवर एका विशिष्ट आरोपाचं सरसकट लेबल लावणं हेही मला मान्य नाही.
ग्लॅमरच्या जगातल्या माणसांना त्यांच्या कामाचा भाग म्हणून बरं-वाईट नाव मिळतं, त्यांच्या चेह:याला ओळख मिळते. त्यांची व्यक्तिगत सुख-दु:खं, यश-अपयश, त्यांची नाती, त्यातले ताण-तणाव या सगळ्या गोष्टी फार चटकन लोकांच्या पुढे येतात आणि लोकांनाही त्यात विशेष रस असतो म्हणून चर्चा होते. अन्यथा ताण आणि कामाचे प्रेशर, स्पर्धा, त्यातून निर्माण होणारी असुरक्षितता सगळीकडेच आहे. प्रत्येक क्षेत्रत आहे. करिअरच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मिळणारं यश-अपयश, त्यातून निर्माण होणारा ताण तुम्ही कसा हाताळता हे तुम्ही किती महत्त्वाकांक्षी आहात, तुमची वाढ कशा वातावरणात झाली आहे या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. तुमची व्यक्ती म्हणून जडणघडण कशी झालेली आहे यावरून तुम्ही मानसिक पातळीवर किती कणखर आहात, हे ठरतं. या क्षेत्रत त्या कणखरपणाची जरा जास्तच गरज असते, हा मुख्य फरक!
तुमच्या वर्तणुकीचा समतोल तुमच्या कुटुंबावरही अवलंबून असतो. तुम्ही कोणाबरोबर राहता, तुमचे मित्रमैत्रिणी कोण आहेत, हेही महत्त्वाचं आहे. मुंबईसारख्या शहरात एकटय़ाने राहणा:यांच्या बाबतीत हा प्रश्न फार कठीण ठरू शकतो. ठरतोच.
हे क्षेत्र अनप्रेडिक्टेबल आहे. काहीवेळा अतक्र्य आहे. समतोल राखत प्रवास करायचा असेल तर कुटुंब बरोबर हवं. परस्परांवर विश्वास हवा आणि त्यांचा भक्कम पाठिंबा हवा.