शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

डिझाइनची कलतपासणी

By admin | Updated: October 11, 2015 19:50 IST

पारंपरिक शिक्षण शाखांचे निकष सर्जनशीलतेची गरज असलेल्या शाखांना लावण्याची गफलत ब-याचदा होते.

नितीन कुलकर्णी
 
पारंपरिक शिक्षण शाखांचे निकष सर्जनशीलतेची गरज असलेल्या शाखांना लावण्याची गफलत ब-याचदा होते. मुळात डिझाइनच्या शिक्षणासाठी  आवश्यक असणारी कुवत व समज 
आपले शालेय शिक्षण देत नाही. उपजत कुवत, गुण वा कल्पकता  शिक्षणात कुठे जोखलीही जात नाही.  त्यामुळे आतार्पयत घेतलेल्या  पारंपरिक शिक्षणाला  कोणी मोजतही नाही.
---------------------
एकदा एका बाईंचा, मित्रच्या ओळखीतून फोन आला. थोडय़ा काळजीच्या सुरात बोलणा:या  या बाईंच्या घरच्या ज्युनियर मेंबरला डिझाइनमधे उच्चशिक्षण घ्यायचं होतं, आणि एकंदर मार्गदर्शन घेण्याचा त्यांचा उद्देश होता. 
 ‘ड्रॉइंग चांगलंच असायला हवं ना?’ ‘एलिमेंट्री इंटरमीडीएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षांचा उपयोग होईल का?’  ‘डिझाइन कोर्सच्या प्रवेशपरीक्षांची तयारी कशी करायची?’ आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ‘डिझाइनच्या कुठल्या शाखेत प्रवेश घ्यावा, कुठली शाखा व्यावसायिकदृष्टय़ा चांगली पडेल?’ आणि याव्यतिरिक्त प्रत्येक शाखेत काय आहे व त्याची विशेषता काय हेही विचारलं गेलंच. थोडय़ाअधिक फरकांचे अशाच आशयाचे फोन मला मधून मधून येत असतात. आणि प्रत्येक फोन झाल्यावर एकप्रकारच्या विफलतेची भावना मनात येते. या जाणिवेचे मूळ आपल्या एकंदर व्यवस्थेत व विशेष करून शिक्षण क्षेत्रत कला व डिझाइनबद्दल असलेली अनास्था, आणि परिणामस्वरूप समाजात या विषयांचं असलेलं अज्ञान व पोकळ माहिती हे आहे. अर्थात याला सामान्य लोक काय करणार? 
माहिती व तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे तरुण पिढी अशा अपारंपरिक क्षेत्रंकडे आकर्षित होत आहे आणि त्यांच्या आग्रहापोटी आपल्याला याबद्दलची माहिती करून घ्यावी लागत आहे. हे करत असताना साहजिकच आपण पारंपरिक शिक्षण शाखांचे निकष अशा सर्जनशीलतेची गरज असलेल्या शाखांना लावण्याची गफलत करणार हे उघड आहे. कसलीच कल्पना नसलेल्या पालकांना, बारावीची परीक्षा फक्त 55 टक्क्यांनी पास हवी, इतर कुठलीही परीक्षा (एलिमेंट्री, इंटरमीडीएट वगैरे) अथवा विशिष्ट विषय (ड्रॉइंग व क्राफ्ट) इथे गणतीतही नसतात हे ऐकून धक्का बसतो. 
डिझाइनची संस्था अप्रत्यक्षपणो असं म्हणते की, तुम्ही आत्तापर्यंत घेतलेल्या शिक्षणाला आम्ही मोजत नाही. ते अशा अर्थी की डिझाइनच्या शिक्षणासाठी आवश्यक असणारी कुवत व समज तुमचे शालेय शिक्षण देत नाही. दुसरा महत्त्वाचा भाग असा की, तुमच्यात उपजत असलेली कुवत, गुण वा कल्पकता (फक्त कलागुण डिझाइनला कामी येत नाहीत) आत्तापर्यंतच्या शिक्षणात कुठेही जोखली गेलेली नाही, आणि आम्ही तुमच्यात नैसर्गिकपणो उपजत असलेली कल्पकता व उपयोजनेचा कल तपासतो. त्यांचा असाही एक दावा असतो की, विशिष्ट असा तो कल तुम्ही कृत्रिमरीत्या विकसित करू शकत नाही. परंतु दुसरीकडे असंही चित्र दिसतं की, अशा अपारंपरिक क्षेत्रंकडे जाण्याचा कल वाढतो आहे आणि त्याचमुळे अग्रगण्य संस्थांच्या प्रवेशासाठी खूप चढाओढ आहे. याच संधीचा फायदा उठवून प्रवेश परीक्षांचे प्रशिक्षण देणारे अनेक व्यावसायिक वर्ग चालतात, ज्यात कला, स्थापत्य व डिझाइनसाठी एन.आय.डी., एन.आय.एफ.टी., जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थांच्या प्रवेशासाठी प्रशिक्षण दिले जाते. असे वर्ग चालवणा:यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. डिझाइनच्या शास्त्रशुद्ध दृष्टिकोनाची वानवा असलेल्या वातावरणात असे क्लासेस बहुसंख्यांना वरदानच वाटत आहेत. अर्थात हेही खरे की, इथे मिळणारे शिक्षण प्रमाणित असण्याची शक्यता कमीच असणार. काही प्रमाण असणार आणि ते म्हणजे मागील वर्षांचे प्रश्नपत्रिकांचे संच, जे इथे सरावासाठी वापरले जातात. 
इथे मुळात ज्यावर डिझाइन अॅप्टीटय़ूड टेस्ट बेतलेली असते अशी डिझाइनची गृहीत असलेली उपजत क्षमता म्हणजे काय, असा प्रश्न पडेल. साधारणपणो थोडय़ाफार फरकाने सर्वच टेस्ट खालील मुद्दय़ांवर बेतलेल्या असतात.
1 तुम्ही सहजपणो आजूबाजूला दिसणा:या दृश्यांचं किती अवलोकन करता हे बघितलं जातं.
2 एखाद्या कल्पनेतला भाव तुम्ही कसा व्यक्त करू शकता यावर काही प्रश्न बेतलेले असतात.
3 नेहमीच्या जीवनातील समस्या तुम्ही कशी टिपता व ती सोडवण्यासाठी कसा उपाय करता यावर त्यातील कल्पकता तपासली जाते.
4 दिलेल्या विषयावर रेखाटन करू शकण्याची योग्यताही तपासली जाते. 
 
काही उदाहरणं इथे दिली आहेत. 
 
4खाली दिलेल्या सूत्रंच्या आधारे रंगीत पेन्सिलने सादर करा.
सूत्र- अहंकार, प्रेरणा, संवेदनक्षमता, आशादायी सकाळ. 
आता इथे पारंपरिक पद्धतीने चित्र न साकारता चित्र घटकांच्या स्वैर रचनेतून चित्र साकार करायचे आहे.  अॅनॉलॉग ड्रॉइंग या प्रकारात मोडणा:या तंत्रचा उपयोग इथे करायचा आहे. 
 (चित्र 1) - सादृश्य रेखाटन 
 
4तुम्ही आत्ता बसलेल्या जागेवरून दिसत असलेल्या दृश्याचे रेखाटन करा. 
आपला दृष्टिकोन व त्रिमितीय दृश्याचे द्विमितीय रूपांतरण करण्याला, परस्पेक्टिव्हला येथे महत्त्व आहे.  
 (चित्र 2) - परस्पेक्टिव्ह ड्रॉइंग 
4दिलेल्या ठोकळ्याच्या रेखाटनात दिसणा:या तीन भागांपैकी एका भागाला सुटे करून वेगळे रेखाटा. 
 (चित्र 3) - ठोकळ्याच्या तीन भागांचे चित्र.
 
4शहरातल्या एका बसस्टॉपचे हे कृष्णधवल छायाचित्र. या चित्रच्या आधारे लोकांना भेडसावणा:या काही समस्या नोंदवा व त्यांवर कल्पक उपाय सुचवा. 
 
(चित्र 4) - बसस्टॉपचे छायाचित्र 
              (मास्टर ऑफ डिझाइनच्या परीक्षेतील) 
 
तुम्ही जर इथे दिलेल्या कृती गंमत म्हणून करून बघितल्याच तर असं लक्षात येईल की आपल्याला विचार करायला लावणा:या या कृती आहेत आणि केंद्रस्थानी दृश्यं आहेत. दृश्यातून दृश्याचा विचार असं काहीसं अपेक्षित आहे. 
चित्रंचा वापर केवळ एक साधन म्हणून येतो, साध्य म्हणून नव्हे. चित्रंच्या सहाय्याने आपल्याला आपले विचार, भावना व्यक्त करता येणं याला महत्त्व आहे. या सरावाच्या मागे विशिष्ट अशी मानवी अनुभवजन्य ज्ञानग्रहणाची संकल्पना आहे आणि शाळेच्या संदर्भात बघितले तर भाषा व विज्ञान या विषयांखेरीज अशी संकल्पना वापरली जात नाही. 
कलाविषय तर अगदी निर्बुद्धपणो शिकवला जातो. त्यामुळे प्रवेशपरीक्षांच्या संदर्भात हा शिकवण्याचा विषय बनला आहे. आज गरज आहे ती सखोलपणो या गरजेचा विचार करून सराववर्गापलीकडे जाऊन डिझाइनच्या क्षमतेची जाणीव निर्माण करणा:या स्वायत्त संस्थेची.
 
(लेखक नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेत डिझाइन या विषयाचे प्राध्यापक आहेत.) 
nitindrak@gmail.com