शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य प्रवाहापासून दूर ‘बडा माडिया’ जमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 06:00 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागाला आज आधुनिकतेचा काही अंशी का असेना, स्पर्श झाला आहे. पण भागमरागड तालुक्याच्या छत्तीसगड सीमेकडील डोंगराळ भागातल्या छोट्या गावांमध्ये राहणारे बडा माडिया जमातीचे लोक आजही मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहेत.

ठळक मुद्दे प्रोटेक्टेड व्हिलेज प्रवर्गात समाविष्ट करावे

अरविंद ना.पोरेड्डीवारगडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागाला आज आधुनिकतेचा काही अंशी का असेना, स्पर्श झाला आहे. पण भागमरागड तालुक्याच्या छत्तीसगड सीमेकडील डोंगराळ भागातल्या छोट्या गावांमध्ये राहणारे बडा माडिया जमातीचे लोक आजही मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहेत. ३०-३५ वर्षांपूर्वी हे लोक बाहेरील कोणी अनोळखी माणूस दिसला की पळून जात, किंवा तो माणूस आपल्यावर आक्रमण करतो आहे, अशा समजुतीतून त्याच्याशी हिंसक पद्धतीने वागत असत. आज ती परिस्थिती नसली तरी त्यांच्या खाणपानापासून तर राहणीमानापर्यंत फारसा बदल झालेला नाही. रस्ते, वाहतुकीची साधने, संपर्क सुविधा अशा भौतिक गोष्टी तर दूरच, पण पोट भरण्यासाठीही त्यांना अजून जंगलातील वनस्पतींचाच सहारा घ्यावा लागत आहे.भामरागड या तालुका मुख्यालयापासून ३६ किलोमीटर अंतरावर बिनागुंडा, कुआकोडी, पेरमलभट्टी, पुंगासूर, तुर्रेमर्का, घोटफडी, बंगाळी, धिरंगी, फोदेवाडा आणि कायर ही गावे पहाडावर १५ किलोमीटर परिसरात वसलेली आहेत. जंगलालगतच्या वास्तव्यामुळे पावसाळ्यात मलेरियाचे डास वाढतात. १० वर्षांपूर्वी मलेरियाच्या प्रकोपाने त्यांच्यातील काही कुटुंबे मृत्यूमुखी पडली. २०११ च्या जनगणनेनुसार डोंगरावर राहणाऱ्या त्या १० गावातील बडा माडिया जमातीची लोकसंख्या १००४ आहे. या गावातील अवघ्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांचा परिसरातील मोठे गाव लाहेरी आणि तालुका मुख्यालय असलेल्या भामरागडशी संपर्क असतो. बाकी अनेकांनी तर तालुका मुख्यालयात पायही ठेवलेला नाही. त्या १० गावांपैकी फक्त बिनागुंडा येथे आरोग्य उपकेंद्र आहे. शिक्षणासाठी बिनागुंडा येथे एकमेव आश्रमशाळा आहे, पण १५ किलोमीटर परिसरात बिनागुंडापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ताही नाही. पावसाळ्याचे ४ महिने आणि नंतरचे २ महिने नदी-नाल्या तुडुंब भरून वाहात असल्याने या भागातील लोकांचा बाहेरच्या जगाशी संपर्कच नसतो. जानेवारीनंतर हे लोक स्वत:च श्रमदानातून रस्ता तयार करून बिनागुंडापर्यंत येण्याची सोय करतात. बडा माडिया प्रजातीमधील रोजी-बेटीचा व्यवहार त्याच १० गावांमध्ये केला जातो. पहाडाच्या मागील बाजुस छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्याची सीमा आहे.ही जमात शेती करीत नाही. काही लोक सपाट जमिनीवर आवत्या (मशागत न करता केलेली पेरणी) टाकून भातशेती करतात. तांदळाच्याच प्रकारातील ‘कोसरी’ पावसाळ्यात जंगलात, पहाडावर फेकतात. त्यावर उगवणाऱ्या पिकातून ते पोट भरतात. गोरगा, ताडी या झाडांचा रस किंवा मोहा हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे. या जमातीमधील बहुतांश कुटुंब शाकाहारी भाजी बनवून खात नाहीत.या जमातीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून प्रयत्न झालेत आणि आजही सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाकडून शासनाच्या योजना राबविल्या जात आहे, पण तरीही मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या या जमातीला, त्यांच्या संस्कृतिला वाचवण्यासाठी ठोस प्रयत्नांची गरज आहे.आदिवासी विकास विभाग पुढाकार घेईल का?भामरागड तालुक्यातल्या या बडा माडिया जमातीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने या गावांना ‘प्रोटेक्टेड व्हिलेज’ प्रवर्गात समाविष्ट करून केंद्र शासनाच्या महत्वपूर्ण धोरणाअंतर्गत इतर भागांप्रमाणे या गावांसाठी विशेष योजना लागू करणे गरजेचे आहे. त्यासाठी चर्चा, संशोधन आणि विचारविनिमय होणे अपेक्षित आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना पत्र देऊन त्यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी २५ डिसेंबर २०१८ ला राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांना पत्र लिहून या भागातील बडा माडिया जमातीच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक उत्थानासाठी त्यांची वस्ती असलेल्या गावांना प्रोटेक्टेड व्हिलेज प्रवर्गात समाविष्ट करावे आणि केंद्र व राज्य सरकारच्या आदिवासींकरिता असलेल्या सर्व विकास योजना प्राधान्याने राबवाव्यात, अशी सूचना केली. पण अद्याप त्यावर कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. आदिवासी विकास विभागाने या गावांना दत्तक घेतल्यास येथील सामाजिक परिस्थितीत आमुलाग्र बदल होऊ शकेल. 

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजना