शहरं
Join us  
Trending Stories
1
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
2
Top Marathi News LIVE: लाडक्या बहिणींना ३००० रुपये, मोफत बस सेवा; पश्चिम बंगाल सरकारने घेतले मोठे निर्णय 
3
प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
4
Twisha Sharma : "हे लोक खूप घाणेरडे, निर्दयी, माझ्या पोटात कोणाचं मूल..."; ट्विशाचं आईसोबत शेवटचं चॅट
5
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
6
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
7
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
8
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
9
"लोक फक्त फोटो काढत राहिले, पण तिने त्याची भूक ओळखली अन्..."; काळजाला भिडणारा Video
10
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
11
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
12
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
13
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
14
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
15
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
16
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
17
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
18
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडला
20
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामचा शिंदेसेना, एमआयएमला प्रस्ताव; बहुमताची मॅजिक फिगर गाठण्यासाठी राजकीय हालचालींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 14:12 IST

Malegaon Municipal Election Result 2026 : शहराच्या राजकारणात निवडणूक निकालानंतर कोणती नवीन राजकीय समीकरणे उदयास येतात याबाबत आता सर्वांची उत्सुकता ताणली गेली आहे.

मालेगाव कॅम्प : मालेगाव महापालिका निवडणुकीत सर्वाधिक ४० जागांवर विजय मिळविणाऱ्या इस्लाम आणि समाजवादी पार्टी यांच्या मालेगाव सेक्युलर फ्रंटने बहुमतासाठी लागणारी ४३ ही मॅजिक फिगर गाठण्यासाठी राजकीय हालचाली गतिमान केल्या असून शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर शिंदेसेनेसह एमआयएम यांच्याकडे बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी प्रस्ताव पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शहराच्या राजकारणात निवडणूक निकालानंतर कोणती नवीन राजकीय समीकरणे उदयास येतात याबाबत आता सर्वांची उत्सुकता ताणली गेली आहे. दरम्यान, महापौरपद पूर्वला आणि उपमहापौरपद पश्चिमला हा गेल्यावेळचा फॉर्म्युला यावेळी पुन्हा राबविला जाण्याचीही दाट शक्यता वर्तविली जात आहे.

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत सर्वाधिक ३५ जागा जिंकून माजी आमदार असिफ शेख यांचा इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र (इस्लाम) हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर इस्लामसोबत युती केलेल्या समाजवादी पक्षाने ५ जागा जिंकल्या आहेत. दोन्ही मिळून ४० जागा जिंकल्या असल्या तरी त्यांच्या मालेगाव सेक्यूलर फ्रंटला बहुमतासाठी लागणाऱ्या ४३ चा आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे अन्य पक्षांचा पाठिंबा घेत फ्रंटला सत्तेत यावे लागणार आहे.

निवडणुकीत एमआयएमने २१, शिंदेसेनेने १८, कॉंग्रेसने ३, भाजपने २ जागा जिंकल्या आहेत. इस्लाम पार्टीचे सर्वाधिक ३५ उमेदवार निवडून आल्याने साहजिकच त्याच पार्टीचा महापौर होणार हे निश्चित आहे. आता निवडणूक निकालानंतर सत्तेची गणिते जुळविण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. इस्लाम-समाजवादी यांच्या मालेगाव सेक्युलर फ्रंटने शिंदेसेनेला सत्तेत सहभागासाठी प्रस्ताव पाठविला आहे. तसाच बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी एमआयएमला देखील प्रस्ताव गेल्याची खात्रीलायक माहिती आहे, निवडणूक प्रचार काळात माजी आमदार असिफ शेख यांनी एमआयएम व काँग्रेसशी पदांसाठी कधीही हातमिळवणी केली जाणार नाही, असे सांगितले होते. त्यामुळे इस्लामकडून सत्तेत सहभागासाठी प्रामुख्याने अगोदर शिंदेसेनेला पसंती दिली जाण्याची शक्यता असून काँग्रेसला दूर ठेवले जाण्याचीही चर्चा आहे.

महापौर पूर्वला, उपमहापौरपद पश्चिमला

गेल्यावेळी काँग्रेस-शिवसेना महापालिकेत सत्तेत होती. यावेळी काँग्रेस व नंतर राष्ट्रवादीचे महापौर झाले, तर उपमहापौरपद शिवसेनेने भूषविले. आताही शिंदेसेनेने पाठिंबा दिल्यास उपमहापौरपद पदरात पडण्याची शक्यता आहे. यापूर्वी सखाराम घोडके, रशिद येवलेवाला, अॅड. ज्योती भोसले, नरेंद्र सोनवणे, नीलेश आहेर यांनी ठरावीक कालावधीत उपमहापौरपद भूषविले आहे.

शिंदेसेनेला इस्लाम व एमआयएम या दोन्ही पक्षांकडून सत्तेत सहभागी व्हावे असे प्रस्ताव आले आहेत, तर शिक्षणमंत्री दादा भुसे हे वरिष्ठ पातळीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून मालेगावी कोणासोबत सत्तेत सहभागी व्हायचे हे निश्चित करतील.
- अॅड. संजय दुसाने, जिल्हाप्रमुख, शिंदेसेना, मालेगाव ग्रामीण.

शहरात सर्वांत मोठा पक्ष म्हणून इस्लाम उदयास आला आहे. दोन नंबरवर एमआयएम असला तरी आम्ही शहर विकासासाठी इस्लाम पार्टीसोबत सत्तेत जाण्याचा विचार करत आहोत. वेळेवर योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आमचे नेते आमदार मुफ्ती मौलाना यांनीच सांगितले आहे.
- अब्दुल मलिक युनूस ईसा, माजी महापौर, शहर अध्यक्ष एमआयएम

इस्लाम व सहयोगी समाजवादी पक्षाची अगोदरपासून युती आहे. यात महापौर, उपमहापौर अथवा सत्ता स्थापनेसाठी आम्ही शहराचा विकास करण्याचा हेतू पुढे ठेवून बिनशर्त पाठिंब्यासाठी एमआयएम, शिंदेसेना व इतरांना प्रस्ताव मांडले आहेत. पुढे काय होते ते बघू.
- नाविद खातिब अहमद, शहराध्यक्ष, इस्लाम पार्टी.

एमआयएम सांप्रदायिक पक्षांसोबत जाणार नाही

मालेगाव एमआयएम कोणत्याही परिस्थितीत 'फिरकापरस्त (सांप्रदायिक)' पक्षांसोबत सत्ता स्थापन करणार नाही. मात्र, शहराच्या विकासासाठी इस्लाम पक्षाशी चर्चा करण्यास एमआयएम तयार असल्याचे एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद यांनी स्पष्ट केले आहे.

आमदार मुफ्ती म्हणाले की, निकालापूर्वी जितक्या जागांची अपेक्षा होती, तितक्या जागा प्रत्यक्षात मिळाल्या नाहीत. तथापि, मांच्या संख्येच्या दृष्टीने एमआयएमच्या उमेदवारांना सर्वाधिक मते मिळाली असून खरा जनतेचा कौल एमआयएमलाच मिळालेला आहे, असा दावाही त्यांनी केला. इस्लाम पक्षाच्या उमेदवारांना १ लाख ७ हजार मते मिळाली असून एमआयएमच्या उमेदवारांना १ लाख १७ हजार मते मिळाल्याचे त्यांनी सांगितले. 

इस्लाम पक्षासोबत सत्ता स्थापनेसंदर्भात बोलताना आमदार मुफ्ती यांनी मात्र अट घालत सांगितले की, चर्चेसाठी इस्लाम पक्षाने पुढाकार घ्यावा. शहराचा विकास आणि नागरिकांना सांप्रदायिक शक्तींपासून दूर ठेवण्याच्या भूमिकेवर चर्चा करायची असल्यास आम्ही तयार आहोत, असेही त्यांनी नमूद केले. मात्र, तसेच, इस्लाम पक्षासोबत बिनशर्त चर्चा होणे कठीण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जर इस्लाम पक्षाशी चर्चा झाली नाही, तर पक्षश्रेष्ठींशी सल्लामसलत करून पुढील निर्णय घेतला जाईल. एमआयएम कोणत्याही परिस्थितीत या पक्षांसोबत जाणार नाही, मग सत्ता येतो अथवा न येवो, असेही मौलाना मुफ्ती यांनी ठामपणे सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Malegaon: Islam Party woos Shinde Sena, MIM for power.

Web Summary : Islam Party, winning most seats in Malegaon, proposes unconditional support from Shinde Sena, MIM to reach majority. Political activity intensifies post-election.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६MalegaonमालेगांवMalegaon Municipal Corporation Electionमालेगाव महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६PoliticsराजकारणAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनShiv Senaशिवसेना