शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘कुस्ती’च्या मातीतील ‘जीम’ जोरात

By admin | Updated: November 2, 2014 23:54 IST

आरोग्य संपदा : तरुण-तरुणी, गृहिणींबरोबर ज्येष्ठांचीही पसंती

प्रदीप शिंदे- कोल्हापूर -धकाधकीच्या युगात व फास्ट फूड जीवनशैलीमुळे कमी वयातच हाय ब्लडप्रेशर, मधुमेह, पाठदुखी, कंबरदुखी यासारख्या व्याधींचा सामना करावा लागतोय. या सगळ्यांवर औषधोपचारांच्या जोडीला व्यायामाची गरज असल्याने तरुण-तरुणी, गृहिणी आणि ज्येष्ठांचाही ओढा आता ‘जीम’कडे वाढला आहे. त्यामुळेच ‘लाल’ मातीतील कुस्तीत रमणाऱ्या कोल्हापूरकरांमध्ये आता ‘जीम’ संस्कृती रुजू लागली आहेत. रोजच्या धकाधकीच्या जीवनात फिटनेसचे महत्त्व वाढत आहे. पहाटे लवकर उठून फिरायला जाणे आणि घरच्या घरी योगा करणे या संकल्पनेचे दररोज नियोजन सगळ्यांच्याकडून पाळले जातेच असे नाही. स्पर्धेच्या युगात सगळ्याच वेळेला महत्त्व आले. व्यवसाय, नोकरीमधील टेन्शन अगदी डोक्यावर घेऊन वावरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याचा परिणाम आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. यामुळे जीम संस्कृतीने आता घराघरांत शिरकाव केला आहे. अशातच जीम संस्कृती रुजविण्यात चित्रपटांचाही मोठा वाटा आहे. फिटनेस, फिगरसारखे कानमंत्र तिथूनच समाजात रुजविले जात असल्याने तरुणाईपाठोपाठ आता गृहिणींचाही जीम संस्कृतीकडे ओढा वाढला आहे. शहरातील जवळपास सगळ्याच जीममध्ये महिलांसाठी विशेष बॅच राखीव ठेवली जात आहे. पूर्वी शहरात केवळ दोन ते तीनच जीम होत्या. त्यामुळे त्यांची फीदेखील हजारोंच्या घरात होती. आता मात्र ही परिस्थिती एकदम बदलली आहे. सध्या चौकाचौकांत अद्ययावत सोयींनी सुसज्ज अशा जीम सुरू झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहक खेचण्यासाठी कमी फीमध्ये जास्तीत जास्त फायद्याच्या स्कीम्म या जीमकडून दिल्या जात आहेत. या क्षेत्रातही स्पर्धा वाढल्याने वेट लॉस, वेट गेन आणि फिटनेस मॅनेजमेंट अशा विविध प्रोग्रॅमसोबत अ‍ॅरोबिक्स, मसाज, स्टीम बाथ, ज्यूस सेंटर, पर्सनल ट्रेनिंग अशा सुविधांचे आमिष दिले जात आहे.घराघरात्ां जीमपूर्वी फक्त मुंबई, दिल्लीतच जीमचे साहित्य मिळत होते. मात्र आता ते कुठेही सहज मिळते. त्यामुळे अनेकजणांनी आपल्या गरजेनुसार घरातच जीम सुरु केली आहे. नवीन सोसायटी, अपार्टमेंट बांधणीवेळीच जीमसाठी स्वतंत्र सोय करण्यात येत आहे. अभिनेत्यांची बॉडी पाहून अनेक युवक जीमकडे वळत आहेत. खुली मैदाने कमी झाल्यामुळे महिलांचाही कल जीमकडे वाढत आहे. स्पर्धात्मक प्रशिक्षण देणे आणि फिटनेस मेन्टेन करणे असे दोन प्रकार जीममध्ये घडत आहेत.- बिभिषण पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते