भांडुपमध्ये तरुणाची आत्महत्या

By Admin | Updated: June 25, 2014 01:46 IST2014-06-25T01:46:21+5:302014-06-25T01:46:21+5:30

जिवाला कंटाळून भांडुपमध्ये मनोज अप्पा सावंत या 22 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली.

The youth's suicide in Bhandup | भांडुपमध्ये तरुणाची आत्महत्या

भांडुपमध्ये तरुणाची आत्महत्या

>मुंबई : जिवाला कंटाळून भांडुपमध्ये  मनोज अप्पा सावंत या 22 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. 
 मनोज आईबाबा आणि  मोठय़ा भावासोबत  साईधन चाळीमध्ये राहत होता. आईबाबा गावी गेले असताना रविवारी सायंकाळी मनोजने राहत्या घरी गळफास घेतला. सोमवारी सायंकाळी घरी परतलेल्या भावाने घराला आतून कडी असल्याकारणाने दरवाजा ठोठावला.  काहीही प्रतिसाद येत नसल्यामुळे त्याने खिडकीतून पाहिले असता मनोज गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याने घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. मनोजला त्वरित मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित केले. पोलिसांना घटनास्थळाहून सुसाइड नोटही मिळाली आहे, ज्यामध्ये जिवाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The youth's suicide in Bhandup