शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनी चोरली एके-४७ रायफल !

By admin | Updated: November 3, 2014 00:39 IST

शहरात फिरायला आलेल्या तरूणांच्या वाहनांतील पेट्रोल संपल्यानंतर त्यांनी एका दुचाकीतून प्रेट्रोल तर चोरलेच मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगरक्षकाच्या बंद घरातून एके-४७ रायफलसह सोन्याचा

२३ राऊंड झाडले : पोलिसाच्या बंद घरातच चोरी; दोघांना अटक नरेश रहिले - गोंदियाशहरात फिरायला आलेल्या तरूणांच्या वाहनांतील पेट्रोल संपल्यानंतर त्यांनी एका दुचाकीतून प्रेट्रोल तर चोरलेच मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगरक्षकाच्या बंद घरातून एके-४७ रायफलसह सोन्याचा हारही त्यांनी लांबविला. ११ दिवसांनंतर पोलिसांना या दोन तरुणांना जेरबंद केले.आमगाव तालुक्यातील भोसा येथील मनोहर उर्फ गोलू योगेश्वर फरकुंडे (२२) हा २१ आॅक्टोबरला अभिषेक बहेकार (२२) या आपल्या मित्रासह गोंदियाला मोटारसायकलवर फिरण्यासाठी आला होता. दोघेही दुपारपासून सायंकाळपर्यंत शहरात फिरले. त्यामुळे त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपले. गावाला परतण्यासाठी कारंजा येथील हिमगिरी ले आऊट परिसरातील एका घरासमोरील दुचाकीमधील पेट्रोल चोरल्यावर त्यांना एक घर बंद दिसले. त्यांनी घराचे दार फोडून एक सोन्याचा हार, सहा ग्रॅम वजनाचे कानातील दोन टॉप्स व एके-४७ रायफल, दोन मॅग्जीन असा ऐवज पळविला. भोषाला जाण्यापूर्वी त्यांनी चोरीचे दागिणे व इतर ऐवज एका छोट्या पुलाच्या पाईपजवळील कचऱ्यात झाकून ठेवले होते. दिवाळीत फटाक्यांच्या आवाजातच त्यांनी गावातील एका मैदानावर एके-४७ मधून गोळ्या झाडून पाहिल्याचे पोलिसांना सांगितले. चोरी गेलेल्या ६० राऊंड पैकी २३ राऊंड नसल्याची सूत्रांची माहिती आहे.पोलीसही होते काळजीतजिल्हाधिकाऱ्यांचा अंगरक्षक ज्ञानेश्वर बकीराम औरासे यांच्या घरातून तरुणांनी ही चोरी केली. दोन मॅग्जीन म्हणजेच ६० राऊंड चोरीला गेल्याने पोलीसही काळजीत पडले होते. ११ दिवसांच्या तपासानंतर रविवारी पहाटे पोलिसांनी मनोहर फरकुंडेचे घर गाठले. त्याच्याकडून रायफल व इतर ऐवज जप्त करण्यात आल्ृाा. पोलिसांनी आधी त्याला न नंतर त्याच्या साथीदाराला अटक केली.हवेतील गोळीबाराबाबत शंका पोलिसांना आरोपींनी हवेत गोळीबार केल्याबाबत साशंकता आहे. कारण गोळीबार केल्याच्या परिसरात पोलिसांना बुलेट कॅप मिळालेल्या नाहीत.