शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पानसरेंच्या घरापासून रविवारी निघणार युवा संघर्ष संदेश जथ्था

By admin | Updated: October 1, 2015 23:30 IST

नऊ आॅक्टोबरला औरंगाबाद येथे होणाऱ्या अधिवेशनात कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

कोल्हापूर : जातीविरहित, धर्मनिरपेक्ष महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासह जनतेला जागरुक करण्यासाठी लोकशाहीवादी युवा महासंघ राज्य कमिटीतर्फे युवा संघर्ष संदेश जथ्थ्याचे आयोजन केले आहे. रविवारी (दि. ४) अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या निवासस्थानापासून जथ्था निघेल, अशी माहिती युवा महासंघ राज्य कमिटीचे सदस्य शिवाजी मगदूम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, समाजातील अंधश्रद्धेचा अंधकार दूर करण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी काम केले; तर कामगार, कष्टकऱ्यांच्या कल्याणासाठी अ‍ॅड. पानसरे लढत राहिले. या दोन विचारवंतांच्या हत्या करण्यात आल्या. लोकांना जागृत करण्यासाठी पुणे येथे डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडलेल्या ठिकाणापासून, तर कोल्हापुरातील अ‍ॅड. पानसरे यांच्या घरापासून जथ्था निघणार आहे. रविवारी सकाळी साडेदहा वाजता कसबा बावड्यातील शाहू जन्मस्थळाला जथ्था भेट देणार आहे. त्यानंतर गंगाराम कांबळे स्मृतिस्तंभास अभिवादन व शिवाजी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येईल. शिवाजी पुतळा, जुना राजवाडा, बिंदू चौक, उमा टॉकीज, गोखले कॉलेज, यादवनगर, शास्त्रीनगर या मार्गावरून जथ्था निघून हुतात्मा स्मारक येथे दुपारी साडेबारा वाजता अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता शाहू स्मारक भवन येथे उद्घाटन होईल.पत्रकार परिषदेस उदय नारकर, सुरेश शिपूरकर, धनाजी गुरव, चंद्रकांत यादव, दीपक पवार, रघुनाथ कांबळे, एस. बी. पाटील, सुभाष वाणी उपस्थित होते.(प्रतिनिधी) जथ्थ्याचा प्रवासकोल्हापूरसह पुणे, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, नाशिक, जळगाव, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड या जिल्ह्यांमध्ये जथ्था फिरून नऊ आॅक्टोबरला औरंगाबाद येथे होणाऱ्या अधिवेशनात कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.