शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या सरकारने बातमी खरी मानली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2016 04:15 IST

टीव्हीवर येणारी प्रत्येक ब्रेकिंग न्यूज ही खरी नसते आणि तशी ती खोटीही नसते. तथापि, तुमच्या (!) सरकारने मात्र माझ्याबाबतीत आलेली प्रत्येक न्यूज खरी मानली

फैजपूर (जळगाव) : टीव्हीवर येणारी प्रत्येक ब्रेकिंग न्यूज ही खरी नसते आणि तशी ती खोटीही नसते. तथापि, तुमच्या (!) सरकारने मात्र माझ्याबाबतीत आलेली प्रत्येक न्यूज खरी मानली आणि आपली ४० वर्षांची तपस्या क्षणात संपली, अशी खंत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या समोर व्यक्त केली.मंत्रिपद गेल्यामुळे एक प्रकारे राजकीय विजनवासात असलेले माजी मंत्री खडसे संधी मिळेल, तेव्हा सरकारला टार्गेट करत आहेत. वाढदिवसानिमित्त जळगावात झालेल्या कार्यक्रमातही त्यांनी स्वपक्षाच्या सरकारला चार खडे बोल सुनावले होते. तर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बोलताना, ‘मी मागच्या बाकावर बसलो, तर अनेकांची अडचण होईल,’ असा गर्भीत इशारा दिला होता.फैजपूर येथील म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवाचे रविवारी शिक्षणमंत्री तावडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना तावडे यांनी ‘टीव्हीवर येणारी प्रत्येक ब्रेकिंग न्यूज खरी नसते आणि तशी ती खोटीसुद्धा नसते,’ असे सांगितले होते. त्याचाच धागा पकडत खडसे यांनी आपल्या भाषणादरम्यान तावडे यांच्याकडे कटाक्ष टाकत, माझ्या बाबतीत तुमच्या सरकारने मात्र प्रत्येक ब्रेकिंग न्यूज खरी मानली़, असे उद्गार काढले.