शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘भाजपात राहून शिंदेंशी लढता येणार नाही, स्वगृही परत या’, गणेश नाईकांना संजय राऊतांची खुली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 12:41 IST

Sanjay Raut’s Offer To Ganesh Naik: उद्धवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी गणेश नाईक यांना खुली ऑफर दिली आहे. भाजपामध्ये राहून शिंदेंविरोधात लढता येणार नाही, त्यामुळे गणेश नाईक यांनी स्वगृही परत आलं पाहिजे, अशी ऑफर संजय राऊत यांनी दिली आहे.  

राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यामध्ये  गेल्या काही काळापासून ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरावरील वर्चस्वावरून मोठ्या प्रमाणावर राजकीय संघर्ष सुरू आहे. दोन्ही नेते आणि त्यांच्या समर्थकांकडून सातत्यांने एकमेकांना आव्हान आणि प्रतिआव्हान दिले जात आहे. आरोप प्रत्यारोप होत आहेत.  त्या पार्श्वभूमीवर आता उद्धवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी गणेश नाईक यांना खुली ऑफर दिली आहे. भाजपामध्ये राहून शिंदेंविरोधात लढता येणार नाही, त्यामुळे गणेश नाईक यांनी स्वगृही परत आलं पाहिजे, अशी ऑफर संजय राऊत यांनी दिली आहे.

महानगरपालिका निवडणुकीदरम्यान नवी मुंबईत पेटलेला नाईक आणि शिंदेंमधील संघर्ष गेल्या काही दिवसांत पुन्हा उफाळून आला आहे. यादरम्यान, माझ्या नादाला लागलात तर माजी खासदार करून टाकेन, असा इशारा गणेश नाईक यांनी श्रीकांत शिंदे यांना दिला होता. त्यानंतर एवढीच खुमखुमी असेल तर लोकसभा निवडणुकीत आमच्याविरोधात लढा, असं आव्हान श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना दिलं होतं.

या पार्श्वभूमीवर गणेश नाईक यांना उद्धवसेनेत प्रवेशाची ऑफर देताना संजय राऊत म्हणाले की, हा भ्रष्टाचार असाच सुरू राहिला तर एक दिवस एकनाथ शिंदे यांना तुरुंगात जावं लागेल, असे गणेश नाईक म्हणत आहेत. मात्र त्यांना पाठबळ मिळत आहे का? तर नाही. गणेश नाईक यांना ही लढाई सत्तेत राहून लढता येणार नाही. पाठबळ असेल तर कारवाई व्हायला हवी.

संजय राऊत पुढे म्हणाले की, ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव कॅबिनेटमधील एका मंत्र्यावर पोरकटासारखे हल्ले करताहेत. ते पाहता माझं गणेश नाईक यांना आवाहन आहे की, तुम्हाला ही लढाई भाजपामध्ये राहून कधीच लढता येणार नाही. तुमच्या हातापायात बेड्या टाकून तुम्हाला लढायला पाठवलं आहे. तुम्ही स्वगृही आलं पाहिजे. तुम्ही शिवसेनेच्या मूळ प्रवाहात आलं पाहिजे आणि तिथून ही लढाई सुरू केली पाहिजे, अशी ऑफर संजय राऊत यांनी यावेळी दिली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sanjay Raut Offers Ganesh Naik to Return Home, Fight Shinde

Web Summary : Sanjay Raut invites Ganesh Naik to join Shiv Sena, saying he cannot effectively challenge Eknath Shinde while in BJP. Raut suggests Naik return to his original party to fight against corruption, as Naik's efforts within the ruling coalition are futile.
टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतGanesh Naikगणेश नाईकShrikant Shindeश्रीकांत शिंदेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा