"एकाला भीती घालू शकता, ३५ आमदारांना कसं घाबरवणार?", रोहित पवारांचे विलिनीकरणावर स्फोटक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 15:21 IST2026-02-17T15:18:26+5:302026-02-17T15:21:30+5:30

आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केला. विलिनीकरणावर बोलून नये म्हणून आमदारांना धमकावले, असा दावा त्यांनी केला आहे

"You can scare one, how can you scare 35 MLAs?", Rohit Pawar's explosive statement on merger | "एकाला भीती घालू शकता, ३५ आमदारांना कसं घाबरवणार?", रोहित पवारांचे विलिनीकरणावर स्फोटक विधान

"एकाला भीती घालू शकता, ३५ आमदारांना कसं घाबरवणार?", रोहित पवारांचे विलिनीकरणावर स्फोटक विधान

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना आमदार रोहित पवार यांनी स्फोटक दावा केला. "नरहरी झिरवळ यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर स्पष्ट भूमिका मांडली होती. झिरवळ यांना भीती घालण्यासाठी त्यांच्यासोबत तो प्रकार घडला नाहीये ना? तुम्ही एका आमदाराला भीती घालू शकता, ३५ आमदारांना भीती कशी घालणार?", असा सवाल करत आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य केले. 

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूपासून आमदार रोहित पवार वेगवेगळ्या शंका आणि प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांना विलिनीकरणाबद्दल विचारण्यात आले असता, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या प्रमुख नेत्यांची नावे न घेता त्यांच्याकडून आमदारांना विलिनीकरणावर बोलण्यात मज्जाव करण्यात आल्याचे सांगितले. 

"आमदारांना सांगितलं विलिनीकरणावर बोलू नका" 

रोहित पवार म्हणाले, "आम्ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा थांबवली आहे. आता तेच याबद्दल चर्चा करत आहेत. मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की, ते आमदारांना बैठकीला बोलावतात आणि एका रांगेत बसवून सांगतात की, विलिनीकरणाबद्दल बोलू नका."

"आमच्यासाठी विलिनीकरणाचा विषय संपलेला आहे. अजितदादा असताना आमच्यात काय चर्चा झाली होती, हे आम्हाला माहिती आहे. आम्ही दादांसोबत एनडीए आघाडीत सामील व्हायचे की, अजितदादा सत्तेच्या बाहेर येऊन आमच्यासोबत रस्त्यावरची लढाई लढणार होते, याबद्दल अजित पवार आणि आमच्या चर्चा झाली होती. पण आता अजित पवारच नाहीत. त्यामुळे यावरील चर्चा गौण आहे", असा खुलासा रोहित पवार यांनी केला. 
 
सीसीटीव्ही फुटेज बाहेर काढा

रोहित पवार अजित पवारांसोबत झालेल्या बैठकांबद्दल म्हणाले की, "अजित पवार आम्हाला भेटायचे तेव्हा बहुतेकदा ते जयंत पाटील यांच्या घरीच भेटायचे. जयंत पाटील यांच्या घरासमोर लोढा यांचे घर आहे. तिथे सीसीटीव्ही आहेत. गेल्या दीड वर्षातील सीसीटीव्ही फुटेज बाहेर काढा म्हणजे अजित पवार किती वेळा भेटले हे कळेल", अशी भूमिका रोहित पवारांनी मांडली आहे. 

"काही नेते त्यांचे स्वतःचे राष्ट्रवादीतील (अजित पवार) महत्त्व टिकून राहावे, यासाठी मुद्दा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना विरोध करत आहेत. विलिनीकरणावर चर्चा होत राहिली आणि आपण शरद पवार, सुप्रिया सुळेंना विरोध केला, तर आपले महत्त्व टिकून राहील असे या नेत्यांना वाटते", अशी टीका रोहित पवारांनी केली. 

सुनेत्रा पवारांना आमचा बाहेरून पाठिंबा

"राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील ३५ आमदारांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून सुनेत्रा पवार यांचे नाव सुचवले, तसेच ३२ ते ३३ संघटनांच्या प्रमुखांनीही सुनेत्रा पवारच अध्यक्षा असाव्यात, असा प्रस्ताव मांडल्याचे मी प्रसारमाध्यमांद्वारे समजले. सुनेत्रा काकींच्या नावाला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आमचा बाहेरून पाठिंबा आहे", असे विधान रोहित पवार यांनी केले. 

 

Web Title : रोहित पवार: 35 विधायकों को डरा नहीं सकते, विलय पर दबाव का आरोप

Web Summary : रोहित पवार का आरोप है कि एनसीपी विलय पर चर्चा से विधायकों पर दबाव डाला जा रहा है। उन्होंने अजित पवार की बैठकों के सीसीटीवी फुटेज की जांच का सुझाव दिया। उन्होंने सुनेत्रा पवार के संभावित नेतृत्व का समर्थन किया।

Web Title : Rohit Pawar: Can't scare 35 MLAs, slams merger pressure.

Web Summary : Rohit Pawar alleges MLAs are pressured against discussing NCP merger. He suggests examining CCTV footage of Ajit Pawar's meetings. He supports Sunetra Pawar's potential leadership.