"तुम्ही शूर्पणखा बहिणीची साथ देत आहात", रुपाली पाटील भडकल्या, अशोक खरात-रुपाली चाकणकरांचे भरणेंना दाखवले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 11:46 IST2026-03-20T11:42:36+5:302026-03-20T11:46:57+5:30

Rupali Chakankar Ashok Kharat: अशोक खरात प्रकरणात कॅबिनेट मंत्री दत्ता भरणे यांनी रुपाली चाकणकरांची बाजू घेतली. त्यानंतर रुपाली पाटील-ठोंबरे यांनी त्यांना उत्तर देणारी पोस्ट लिहिली आहे. त्यांनी फोटोही शेअर केले आहेत. 

"You are supporting Shurpanakha Bhahini", Rupali Patil got angry, showed photos of Ashok Kharat-Rupali Chakankar to Bharane | "तुम्ही शूर्पणखा बहिणीची साथ देत आहात", रुपाली पाटील भडकल्या, अशोक खरात-रुपाली चाकणकरांचे भरणेंना दाखवले फोटो

"तुम्ही शूर्पणखा बहिणीची साथ देत आहात", रुपाली पाटील भडकल्या, अशोक खरात-रुपाली चाकणकरांचे भरणेंना दाखवले फोटो

Ashok Kharat News: अशोक खरात लैंगिक चाळे करतानाचे व्हिडीओ समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर अडचणीत आल्या आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातसोबत संबंध असल्याचे आणि त्यांच्यासोबतचे फोटो समोर आले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातच दोन गट पडल्याचे दिसत आहे. कॅबिनेट मंत्री दत्ता भरणे यांनी चाकणकरांची बाजू घेतल्यानंतर पक्षातील नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी भरणे यांना उत्तर दिले.  "मंत्री महोदय भरणे मामा चुकत आहात", असे म्हणत त्यांनी काही फोटोही शेअर केले आहेत. 

अशोक खरात प्रकरणात रुपाली पाटील-ठोंबरे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना घेरले आहे. दत्ता भरणे यांनी या प्रकरणात मांडलेल्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करत रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, "मंत्री महोदय भरणे मामा चुकत आहात. आपल्या कॅप्टन अशोक खरात भोंदूबाची खरी माहिती देण्यात आली नाही. आपण सुद्धा माहिती घेतलेली दिसत नाही. म्हणून आपण राज्य महिला आयोग चाकणकर यांचा दोष नाही असे म्हणत आहात."

चाकणकरांनी स्थानिक पत्रकाराला धमकी दिली

"त्या भोंदू बाबाच्या संस्थेवर सदस्या म्हणून आहेत. त्याचा फोटो आपल्या माहितीसाठी. वर्षापूवी लोकल पत्रकारांनी भांडाफोड केल्यानंतर पदाचा गैरवापर करून चाकणकर मॅडमने त्यांना धमकी दिली आणि माफीनामा घेण्यात आला तेही पत्र आपल्या माहितीसाठी पुन्हा पोस्ट करत आहे. वर्षा पूर्वीचे आहे", असे उत्तर रुपाली पाटलांनी भरणेंना उत्तर दिले आहे. 

"सध्याचा फोटो आपल्याला पाठवत आहे. त्या फोटोमध्ये कोणीतरी त्यांना कार्यक्रमात बोलवलं आणि फोटो काढला, अशा परिस्थितीचा हा फोटो नाही. कुठेतरी यांचे अत्यंत चांगले घनिष्ठ, जिव्हाळ्याचे संबंध आहेत; अशाच पद्धतीचा हा फोटो आहे", असे आरोप त्यांनी केला आहे.  

रुपाली चाकणकरांना म्हणाल्या, 'शूर्पणखा' 

"मामा तुम्ही चुकलात. चुकीच्या लोकांची बाजू घेत आहात, ज्या लोकांनी महिलावर अन्याय अत्याचार केलेला आहेत त्यांची बाजू आपण घेत आहात. आपण चुकत आहात. महाराष्ट्रातील बहिणींना तुम्ही न्याय न देता शूर्पणखा  बहिणीची साथ देत आहात. दुर्दैव आहे महाराष्ट्राचे", असा संताप रुपाली पाटलांनी व्यक्त केला आहे. 

दत्ता भरणे रुपाली चाकणकरांबद्दल असे काय बोलले?

"या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा काही दोष नाही. काही कार्यक्रमानिमित्त चाकणकर यांची महाराजांशी भेट झाली असेल. शेवटी आपण कुणाला तरी गुरु मानतो, यात रुपाली चाकणकर यांचा काही दोष नाही. कोणासोबत फोटो काढला, तर ती काय चूक आहे का, नाही ना?", अशी भूमिका कॅबिनेट मंत्री दत्ता भरणेंनी मांडली आहे. 

Web Title : रूपाली पाटिल ने भरने को लताड़ा, चाकणकर मामले में गलत लोगों का समर्थन करने का आरोप लगाया

Web Summary : रूपाली पाटिल-ठोंबरे ने अशोक खरात विवाद में रूपाली चाकणकर का बचाव करने के लिए दत्ता भरने की आलोचना की। उन्होंने चाकणकर पर अपने पद का दुरुपयोग करने और गलत लोगों का साथ देने का आरोप लगाया, अपने दावों का समर्थन करने के लिए तस्वीरें साझा कीं। पाटिल ने आक्रोश व्यक्त करते हुए महिलाओं के साथ अन्याय का दावा किया।

Web Title : Rupali Patil Slams Bharne, Alleges Support for Wrongdoers in Chakankar Case

Web Summary : Rupali Patil-Thombre criticizes Datta Bharne for defending Rupali Chakankar in the Ashok Kharat controversy. She accuses Chakankar of misusing her position and siding with wrongdoers, sharing photos to support her claims. Patil expresses outrage, claiming injustice to women.