शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
2
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
3
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
4
Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
5
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
6
Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
7
Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
8
Latest Marathi News LIVE Updates: "ट्रम्प सर्वाधिक भ्रष्ट आणि निष्ठूर माणूस", माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे टीकास्त्र
9
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
10
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
11
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
12
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
13
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
14
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
15
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
16
Shapoor Zadran: अफगाणिस्तान क्रिकेटचा एकेकाळचा आधारस्तंभ, आज मृत्युशी देतोय झुंज, ओळखणंही झालं कठीण!
17
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
18
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
19
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
20
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

होय, आम्ही सारे दाभोलकर

By admin | Updated: August 24, 2014 00:00 IST

अंधश्रद्धा निमरूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध करत त्यांच्या रचनात्मक कार्याचा प्रसार करण्याचा निर्धार पुण्यातील तरुणाईने केला.

पुणो : अंधश्रद्धा निमरूलनाच्या लढाईत प्राणाची आहुती देणा:या अंधश्रद्धा निमरूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध करत त्यांच्या रचनात्मक कार्याचा प्रसार करण्याचा निर्धार पुण्यातील तरुणाईने केला. 
‘लोकमत युवा नेक्स्ट’ आणि ‘लोकमत बालविकास मंच’च्या वतीने हा उपक्रम झाला. विविध शाळा आणि महाविद्यालयांतील विद्याथ्र्यानी डॉ. दाभोलकर यांच्या पहिल्या स्मृतीदिनी कॅँडलमोर्चा काढत त्यांच्या विचारांचा प्रकाश पसरविण्याचा निर्धार केला. 
भारतीय विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय, के. जे. सोमय्या अभियांत्रिकी महाविद्यालय, सी. के. गोयल कनिष्ठ महाविद्यालय, व्ही. आय.टी स्कूल अॅंड ज्युनिअर कॉलेज आणि विद्यांचल स्कूचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.  भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आनंद भालेराव विद्याथ्र्याना मार्गदर्शन करताना म्हणाले, ‘‘ डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या रचनात्मक कार्याचा प्रसार करणो हिच त्यांना स्मृतिदिनी खरी श्रध्दांजली ठरणार आहे.‘‘
व्ही. आय.टी. स्कूलचे प्राचार्य पी.एस. नेमाडे म्हणाले, ‘‘ कृतिशिल तरुणाई ही मोठी ताकद आहे. परिवर्तनाचा विचार पुडे नेऊन समाजात बदल घडविण्याचे काम करावे.’’
के. जे. सोमय्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य संजीव वाघ म्हणाले, ‘‘ अंधश्रध्दा, बुवाबाजी यासारख्या अनिष्ठ रुढींच्या विरोधात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आयुष्यभर लढा दिला. 
आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांचे कार्य पुढे चालविण्याचा वसा विद्याथ्र्यानी घेण्याची गरज आहे.’’ कॅँडलमार्चमध्ये सहभागी झालेल्या विद्याथ्र्यानी आपल्या भावना 
व्यक्त केल्या. ‘लोकमत युवा 
नेक्स्ट’ आणि ‘लोकमत बालविकास मंच’च्या सभासदांनी या उपक्रमात सहभाग घेतला. (प्रतिनिधी)
 
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा शोध न लागणो ही खेदाची गोष्ट आहे. माध्यमे हे लोकांर्पयत पोहोचण्याचे महत्त्वाचे साधन असून डॉ. दाभोलकरांचा विचार सर्वार्पयत जावा, यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत.
- विजय मानकर सी. के. गोयल महाविद्यालयाचे उपप्राचार्य
आजची तरुणाई केवळ बोलकी नाही, तर कृतिशिल आहे, हे दाखविण्याची गरज आहे. कॅँडल मार्च हे केवळ प्रतीक आहे, परंतु, डॉ. दाभोलकर यांचे विचार आत्मसात करणो, हिच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. 
- युवराज भंडारी, के.जे. अभियांत्रिकीचा विद्यार्थी 
‘लोकमत युवा नेक्स्ट’च्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून आजची तरुणाई सामाजिक विषयांवरही किती सजग आहे, हे दिसत आहे. पुरोगामी विचारांची सुरूवात विद्यार्थी जीवनापासून होणो महत्त्वाचे आहे.
- सुनिता फाळके, विद्यांचल स्कूलच्या प्राचार्य 
डॉक्टर आपल्यात आज नसले, तरी त्यांचे कार्य कायम स्मरणात राहणारे आहे. 
- सतिश खामकर, डॉ. डी.वाय.पाटील महाविद्यालयाचा विद्यार्थी