नव्या ढंगात उपनगरांतही रंगणार यंदा पुणो फेस्टिवल

By admin | Published: August 23, 2014 11:58 PM2014-08-23T23:58:18+5:302014-08-23T23:58:18+5:30

कला, गायन, वादन, संगीत, नृत्य, नाट्य, क्रीडा आणि संस्कृती अशा विविध सांस्कृतीक कार्यक्रमांची पर्वणी असलेल्या पुणो फेस्टीव्हलीची रंगत आता उपनगरांमधील पुणोकरांना अनुभवता येणार आहे.

This year's Puno festival will be celebrated in a new fashion | नव्या ढंगात उपनगरांतही रंगणार यंदा पुणो फेस्टिवल

नव्या ढंगात उपनगरांतही रंगणार यंदा पुणो फेस्टिवल

Next
पुणो :  कला, गायन, वादन, संगीत, नृत्य, नाट्य, क्रीडा आणि संस्कृती अशा विविध सांस्कृतीक कार्यक्रमांची पर्वणी असलेल्या पुणो फेस्टीव्हलीची रंगत आता उपनगरांमधील पुणोकरांना अनुभवता येणार आहे.  विविध सांस्कृतीक कलांच्या आविष्काराची एकत्र सांगड घालणा-या या फेस्टीवलची अनुभुती अवघे चारच दिवस घेता येणार आहे. 
या फेस्टीवलचे उद्घाटन यंदा  केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पाच सप्टेंबर रोजी गणोश कला क्रीडा मंच येथे होणार असल्याची माहिती फेस्टीवलचे संयोजक माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  जावडेकर यांच्यासह राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, अभिनेते अनिल कपूर हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
 26 व्या पुणो फेस्टिव्हलचे आयोजन यंदा उपनगरांमध्ये महापालिकेच्या  नवीन नाटयगृहांमध्येही प्रथमच  होणार आहे. सुमारे चार दिवस चालणा:या या फेस्टीवलचे कार्यक्रम या वर्षी दरवर्षी कार्यक्रम होणा:या गणोश कला क्रीडा मंच, बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह या प्रमुख नाटयगृहासंह बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 
स्मारक सभागृह, सहकार नगर 
येथील  पंडीत  भीमसेन जोशी कलादालन, औंध येथील  पंडीत भीमसेन जोशी कलामंदिर तसेच वानवडी येथील  महात्मा फुले सांस्कृतिक भवन या सर्व ठिकाणी होणार आहे. तसेच या ठिकाणी होणा-या सर्व कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश असणार असल्याचे कलमाडी यांनी सांगितले.
(प्रतिनिधी) 
 
संगीत आणि क्रीडा स्पर्धाची रेलचेल
कौशिकी चक्रवर्ती व सहका-यांचा उषा-संगीतकी नई किरण , पं. रोणू मुजूमदार व सहकायांचा व्हायब्रेशन , ऑल इंडिया उर्दू मुशायरा यासह उगवते तारे, इंद्रधनू, मराठी हास्यकवी संमेलन, महिला महोत्सव, मिसेस पुणो फेस्टिव्हल, लावणी महोत्सव, मराठी नाटके असे कार्यक्रम फेस्टिव्हलमध्ये होणार आहेत. त्याशिवाय, गोल्फ टूनार्मेंट, रोलबॉल, बॉक्सिंग, ढोल-ताशा, ध्वज स्पर्धा अशा स्पधार्ही घेतल्या जाणार आहेत.
 
सुपरबाइक्सची 
रॅली काढणार 
यंदच्या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार हेमामालिनी यांची गणोशवंदना, अभिनेत्री ग्रेसी सिंग यांचा नृत्याविष्कार, राज्यातील धार्मिक स्थळांवर आधारित डिवोशनल महाराष्ट्र  हा कार्यक्रम; तसेच लावणी, आदिवासी, कोळी आणि बॉलिवूडचे फ्युजन, असे कार्यक्रम ही या उद्घाटन सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरणार आहेत. तर या वर्षी प्रथमच सुपरबाइक्सची रॅली देखील काढण्यात येणार असल्याने हा सोहळा अनोखा ठरणार असल्याचा दावा संयोजकांकडून करण्यात आला आहे.
 

 

Web Title: This year's Puno festival will be celebrated in a new fashion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.