शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

येरवडयातील बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

By admin | Updated: June 4, 2014 22:41 IST

डॉक्टरकीचा व्यवसाय थाटणा-या बोगस डॉक्टरच्या मुसक्या महापालिकेच्या आरोग्य विभागाने आवळल्या आहेत. आरोग्य विभागाकडून शहरात बोगस डॉक्टरांची शोधमोहीम सुरू आहे.

पुणे : संगणक शास्त्राची पदवी घेऊन डॉक्टरकीचा व्यवसाय थाटणा-या बोगस डॉक्टरच्या मुसक्या महापालिकेच्या आरोग्य विभागाने आवळल्या आहेत. आरोग्य विभागाकडून शहरात बोगस डॉक्टरांची शोधमोहीम सुरू आहे. या तपासणी अंतर्गत या डॉक्टरवर कारवाई करण्यात आली आहे. सरोज सुनिलकुमार पुनावासिराम असे या डॉक्टरचे नाव असून येरवडा येथील जीजामात नगर मध्ये सरोज क्लीनिक या नावाने हा डॉक्टर गेल्या वर्षभरापासून हे क्लिनिक चालवित असल्याची माहिती महापालिकेचे प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. एस.टी परदेशी यांनी दिली. महापालिकेकडून शहरातील बोगस डॉक्टरांच्या तपासणीची शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या अंतर्गत या समितीने केलेल्या तापसणीत या डॉक्टराने पालिकेकडे सादर केलेली कागदपत्रे बोगस आढळून आली. त्यानंतर आज दुपारी 12 च्या सुमारास आरोग्य विभागाच्या या समितीने सरोज क्लिनिकवर धाड घातली. यावेळी हा डॉक्टर रूग्णांची तपासणी करीत होता. यावेळी समितीने त्याच्याकडे असलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी केली असता, या डॉक्टरने महाराष्ट्र मेडीकल कैन्सिलचे प्रमाणपत्र या समितीस दाखविले. मात्र, त्यावर या डॉक्टरचे नाव आणि त्याचा नोंदणी क्रमांक हाताने लिहल्याचे आढळून आले. या क्रमांकाची तपासणी या पथकाने कैन्सिलच्या संकेतस्थळावर केली असता, हा नोंदणी क्रमांक दुस-या एका डॉक्टरचे असल्याचे दिसून आले. तसेच पुनावासियाला आपल्या पदवीबाबत इतर कोणतीही माहिती देता आली नाही. त्यानंतर तत्काळ या डॉक्टवर कारवाई करण्यात आली. तसेच त्याच्यावर बोगस डॉक्टर एमएमपी अँक्ट 33/1,2 नुसार येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे डॉ. परदेशी यांनी सांगितले. तसेच या बोगस डॉक्टरचे ब़ँचलर ऑफ कॉम्प्युटर अँप्लीकेशनचे शिक्षणही घेतले असल्याचे ते म्हणाले. महापालिकेचे अन्न निरिक्षक पी.के कोहकडे, पी.पी निम्हण, आरोग्य निरिक्षक क्षितिज कोंढरे, डॉ. रेखा गलांडे, यांच्या पथकाने सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली.