शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
4
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
5
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
6
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
7
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
8
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
9
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
11
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
12
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
15
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
16
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातल्या पोरींची कुस्ती

By admin | Updated: August 29, 2016 01:22 IST

सुनीता कडोळे महाराष्ट्र राज्यातील पहिल्या महिला कुस्ती प्रशिक्षक.

अकोला, दि. २८: पुरुषांची मक्तेदारी असलेल्या कुस्ती स्पर्धेत साक्षी मलिकनं अद्वितीय कामगिरी करीत चमत्कारच केला. रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिलं पदक साक्षीनं मिळवून दिलं. हरियाणातल्या रोहतकची असलेल्या साक्षीमुळे आज देशाच्या कानाकोपर्‍यातल्या मुली कुस्तीकडे वळत आहेत. साक्षीसारख्याच अनेक मुली उत्साहाने आखाड्यात उतरत आहेत. अकोल्यासारख्या छोट्या शहरातदेखील अनेक महिला कुस्तीपटू आहेत. सुनीता कडोळे या तर महाराष्ट्र राज्यातील पहिल्या महिला कुस्ती प्रशिक्षक आहेत. सुनीता कडोळे यांनी स्वत:च्या मुलीलादेखील कुस्तीगीर केले. आज अकोल्यातल्या ४५ महिला कुस्तीगिरांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविला आहे.
सुनीता मोरेश्‍वर कडोळे यांनी सर्वप्रथम अकोल्यात महिलांकरिता कुस्तीची सुरुवात केली. त्यांनी विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेत सन २00७ मध्ये पहिले सुवर्ण पदक पटकाविले. त्यानंतर २00९ मधील विदर्भ केसरी स्पर्धेतदेखील सुवर्ण पदक पटकाविले.
तसेच विदर्भस्तरीय कुस्ती स्पर्धेत चार रौप्य पदकं मिळविली. श्री मोरेश्‍वर महिला कुस्ती संस्थेची स्थापना करू न त्याअंतर्गत अनेक मुलींना कुस्तीचे प्रशिक्षण दिले. संस्थेच्या संघाने नागपूर आणि देवळी (वर्धा) येथे झालेल्या विदर्भ केसरी स्पर्धेत द्वितीय क्रमांकाची चॅम्पियन ट्रॉफी मिळविली.
सुनीताताईंनी महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत ८ वेळा अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. दोन वेळा खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा खेळल्या. या स्पर्धेत संस्थेच्या महिला कुस्तीगिरांनी उत्कृष्ट खेळप्रदर्शन करीत तृतीय क्रमांकाची चॅम्पियन ट्रॉफी पटकाविली. यानंतर सुनीताताईंनी आपली मुलगी माधुरी हिला कुस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली. दोघी मायलेकी महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा असो की विदर्भ कुस्ती स्पर्धा. एकाच स्पर्धेत एकाच मॅटवर खेळत असत. मायलेकींची कुस्ती बघण्यासाठी स्टेडिअमवर खचाखच गर्दी होत असे. बक्षीसही भरपूर मिळायचे. मायलेकी कुस्तीपटू म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाल्या. या दोघींची प्रसिद्धी बघून इतर महिलादेखील कुस्ती शिकण्यासाठी सुनीताताईंच्या तालीम संघात येऊ लागल्या. त्यांच्या तालमीतील महिला कुस्तीपटूंनी शालेयस्तर स्पर्धेत २५ पदके पटकाविली. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत खेळप्रदर्शन करीत आठ मुलींनी कलरकोट प्राप्त केले. नॅशनल कॅडेट कुस्ती स्पर्धेतही संस्थेच्या प्रशिक्षणार्थींनी उत्तम खेळप्रदर्शन केले.
पायका (ग्रामीण) कुस्ती स्पर्धेत तीन वेळा उत्कृष्ट खेळप्रदर्शन केले. यामध्ये सुनीताताईंची मुलगी माधुरी हिने राज्य स्तरावर कांस्य पदक पटकाविले. आज संस्थेच्या अनेक मुलींनी कुस्तीच्या भरवशावर पोलीस दलात व सरकारी नोकरीत प्रवेश मिळविला.


शेतमजुरी करणा-या मुली शिकताहेत कुस्ती
मोरेश्‍वर महिला कुस्ती संस्थेमध्ये कुस्ती खेळण्यास येणार्‍या प्रत्येक मुलींची वेगळी कहाणी आहे; परंतु एक साम्य सर्वांंमध्ये आहे, ते म्हणजे जवळपास सर्व मुली या शेतमजुरी करणार्‍या आहेत. दिवसभर शेतीत राबून शालेय शिक्षणाची आवड आणि कुस्तीचं वेड जोपासत आहेत. संस्थेमध्ये ४५ मुली नियमित सराव करतात. या मुलींकडून एक छदामही मोरेश्‍वर महिला कुस्ती संस्थेच्या अध्यक्ष सुनीता कडोळे घेत नाहीत. सुनीताताईंचे पती मोरेश्‍वर कडोळे उत्तम कुस्तीगीर असून, सुनीताताईंना त्यांचे नेहमीच प्रोत्साहन लाभते.