शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन प्रसारासाठी जगभरातील टीम सिंधुदुर्गात

By admin | Updated: October 1, 2015 00:38 IST

राज्य शासनाचा पुढाकार : ‘महाराष्ट्र पर्यटन’ने टूर आॅपरेटर प्रतिनिधींना केले आमंत्रित

मालवण : कोकणचे पर्यटन जगभरातील पर्यटकांना भुलवते. लाखो देशी-विदेशी पर्यटक पर्यटनासाठी ंकोकणला पसंती देत आहेत. काही वर्षांपासून वाढत जाणाऱ्या या पर्यटनाचा प्रसार आणि प्रचार अधिक गतिमानपणे विदेशातही व्हावा या हेतूने महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्यावतीने २५ देशांतील २७ जणांची एक टीम कोकणच्या पर्यटनाची माहिती घेऊन जगभरात प्रसार करणार आहे. दरम्यान, विदेशातील या टीमने सिंधुदुर्गातील निसर्ग आणि पर्यटन पर्यटकांना आकर्षित करणारे आहे. मात्र, त्याच्या जोडीला येथे पायाभूत सुविधा आणि दर्जेदार रस्ते निर्माण झाल्यास कोकणचे पर्यटन जगात अव्वल असेल, असा विश्वास पर्यटन प्रतिनिधींनी व्यक्त केला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन जगभरात पोहोचावे आणि या भागात विदेशी पर्यटक येऊन या भागाचा आर्थिक स्थर उंचावण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने जगभरातील टूर आॅपरेटर कंपनींच्या प्रतिनिधींची टूर आयोजित केली आहे. कोकणातील निसर्गसौंदर्य पर्यटनावर खूश झालेल्या या टूर आॅपरेटर प्रतिनिधिंनी पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करू, असे स्पष्ट केले. महाराष्ट्रात प्रत्येक विभागात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने आॅस्ट्रेलिया, रशिया, जर्मनी, पोलंड, साऊथ आफ्रिका, लोकावाकीया या प्रमुख देशांसह २५ देशांतील पर्यटन प्रतिनिधींची टूर आयोजित के होती. यात तारकर्ली, देवबाग, विजयदुर्ग या पर्यटनस्थळांना प्रतिनिधींनी भेट दिली. तारकर्ली येथील एमटीडीसी येथे या विदेशी पर्यटकांचे स्वागत रत्नागिरी-सिंधुदुर्गचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण यांनी केले. स्थानिक महिलांनी पर्यटकांचे पंचारती ओवाळून पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. (प्रतिनिधी)स्कुबा डायव्हिंग स्नॉर्कलिंगचा लुटला आनंदविदेशी पर्यटकांनी देवबाग येथील वॉटर स्पोर्ट्सचे कौतुक केले, तर तारकर्ली येथील स्कुबा डायव्हिंग स्नॉर्कलिंगचा आनंद लुटला. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्कुबा डायव्हिंग सेंटरलाही त्यांनी भेट दिली. अशा पर्यटन प्रकल्पानंतर सिंधुदुर्ग पर्यटनात नवी उभारी घेईल. येथे पायाभूत सुविधा अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध झाल्यास पर्यटनात निश्चितच वाढ होईल, असेही त्यांनी सांगितले.