शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण उपकेंद्राच्या कामाला मुहूर्त मिळेना

By admin | Updated: August 16, 2014 02:25 IST

१५ आॅगस्टला उपकेंद्राच्या कामाला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आले होते

भार्इंदर : १५ आॅगस्टला उपकेंद्राच्या कामाला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आले होते. परंतु या कामाला सुरुवात झाली नसल्याच्या निषेधार्थ कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते रवींद्र पाटील यांनी शुक्रवारी उपोषण छेडले होते. यावर विद्यापीठ प्रशासनाकडून लवकरच काम सुरू होईल, असे आश्वासन देण्यात आले असून काम सुरू न झाल्यास भूखंड परत घेऊ, अशी भूमिका शिवसेनेकडून घेण्यात आली आहे.कल्याणसह उल्हासनगर, अंबरनाथ, कसारा, कर्जत, टिटवाळा येथून दररोज लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी मुंबई विद्यापीठात जातात. कल्याणमध्ये विद्यापीठाचे उपकेंद्र झाले तर विद्यार्थ्यांच्या खर्चात आणि वेळेतही बचत होईल, या उद्देशाने येथील गांधारी परिसरातील भूखंडावर उपकेंद्राचे भूमिपूजन झाले. परंतु अडीच वर्षांचा कालावधी उलटूनही या उपकेंद्राच्या कामाला सुरुवात झालेली नाही. काम त्वरित सुरू करावे, यासाठी विद्यार्थी संघटनांसह विविध राजकीय पक्षांनी अनेक आंदोलने छेडली आहेत. दरम्यान, शिवसेनेचे पालिका गटनेते पाटील यांनीही मध्यंतरी उपोषणाचा इशारा दिला होता. यावर १५ आॅगस्टला या कामाला सुरुवात करू, असे आश्वासन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. नरेशचंद्र यांनी दिले होते. याउपरही काम सुरू न झाल्याने अखेर पाटील यांनी उपकेंद्राच्या ठिकाणी शुक्रवारी उपोषण छेडले. (प्रतिनिधी)