शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

जोवर जावेद अख्तर माफी मागणार नाहीत, तोवर त्यांच्या चित्रपटांचं स्क्रिनिंग होऊ देणार नाही; भाजप आमदाराचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2021 11:08 PM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणाऱ्यांची मानसिकता तालिबानी प्रवृत्तीचीच असल्याचं वक्तव्य जावेद अख्तर यांनी केलं होतं.

ठळक मुद्देराष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणाऱ्यांची मानसिकता तालिबानी प्रवृत्तीचीच असल्याचं वक्तव्य जावेद अख्तर यांनी केलं होतं.

"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणाऱ्यांची मानसिकता तालिबानी प्रवृत्तीचीच आहे," असं विधान प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी केलं होतं. तालिबानी प्रवृत्ती रानटी असल्याचं सांगत त्यांनी तालिबानवर टीकेची झोड उठवली. याचवेळी भारताचं तालिबान कधी होऊ शकत नाही, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. परंतु त्यांच्या वक्तव्यावरून आता रोष व्यक्त केला जात आहे. भाजपचे नेते आणि आमदार राम कदम यांनी जावेद अख्तर यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.

"जावेद अख्तर यांचं वक्तव्या हे केवळ दुर्दैवी नाही तर, संघ, विश्व हिंदू परिषदेच्या कोट्यवधी कार्यकर्ते आणि जगभरातील या विचारधारेला मानणारे कोट्यवधी लोकांचा अपमान आहे! जोपर्यंत जावेद अख्तर हाथ जोडून माफी मागत नाही तोपर्यंत त्याची, त्यांच्या कुटुंबीयांचा कोणताही चित्रपट या भूमित चालू देणार नाही," असं राम कदम म्हणाले. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करत हा इशारा दिला आहे. "संघटनांचे कार्यकर्ते गरीब व्यक्तींची सेवा करतात आणि यांनी त्यांचा अपमान केला आहे. हे वक्तव्य करण्यापूर्वी त्यांनी हा विचार केला पाहिजे होता की एकाच विचारधारेची लोकं आता सरकार चालवत आहेत. राजधर्म पूर्ण करत आहेत. जर तालिबानी विचारधारा असती तर त्यांना हे वक्तव्य करता आलं असतं का? यावरून त्यांचं वक्तव्य किती पोकळ आहे हे समजतं," असंही ते म्हणाले.

काय म्हणाले होते जावेद अख्तर ?"ज्या पद्धतीनं तालिबानी हे मुस्लिम राष्ट्र निर्माण करण्यासाठी हिंसक प्रयत्न करत आहेत. त्याच पद्धतीनं आपल्याकडे काहीजण हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडतात. हे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत. तालिबानी हिंसक आहेत. रानटी आहेत. पण आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांचे समर्थन करणारे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत", असं जावेद अख्तर म्हणाले. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर वक्तव्य केलं होतं.

भारतातील मुस्लिमांचा एक लहान गट देखील तालिबानचं समर्थन करतोय हे दुर्दैवी असल्याचंही अख्तर म्हणाले. "तालिबान आणि त्यांच्यासारखं वागण्याची इच्छा ठेवणाऱ्यांमध्ये एक साम्य आहे. देशातील काही मुस्लिमांनीही अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यावर त्याचं स्वागत केलं. हे माझ्यासाठी खूप धक्कादायक होतं. भारतातील मुस्लीम तरुण हे चांगलं जीवन, रोजगार, चांगलं शिक्षण या गोष्टींच्या मागे लागले आहेत. पण मुस्लिमांचा एक गट असा आहे की जो स्त्री-पुरुष असा भेदभाव करतात आणि समाजाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहे," असंही त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :Javed Akhtarजावेद अख्तरMaharashtraमहाराष्ट्रRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRam Kadamराम कदमBJPभाजपाTwitterट्विटर