शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
2
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
3
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
4
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
5
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
6
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
7
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
8
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
9
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
10
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
11
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
12
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
13
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
14
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
15
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
16
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
17
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
18
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
19
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
20
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा

१५ व्या गिरिमित्र संमेलनात महिला गिर्यारोहकांचा सन्मान

By admin | Published: June 16, 2016 1:24 PM

‘गिर्यारोहण आणि महिला’ ही यंदाच्या गिरिमित्र संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना असून महिला गिर्यारोहकांचा सन्मान करण्यात येणार आहे

ऑनलाइन लोकमत
 
मुंबई, दि. 16 - ‘गिर्यारोहण आणि महिला’ ही यंदाच्या गिरिमित्र संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना असून महिला गिर्यारोहकांचा सन्मान करण्यात येणार आहे. यासंदर्भातलं गिरीमित्र संमेलनांचं आवाहन आयोजकांच्याच शब्दांत...
 
नमस्कार गिरिमित्रांनो,
 
आपण सारेचजण डोंगर किल्ल्यांवर मनमुराद भटकणारी माणसं! आपल्या डोंगरभटक्यांच्या जगात स्त्री-पुरुष असा हा भेदभाव नाहीच. पण तरीदेखील काहीशा उशिरा का होईना पण या डोंगरभटक्यांच्या जगात महिलांचा प्रवेश झाला आणि तिथं त्यांनी आपलं एक स्थान निर्माण केलं. ऐंशी-नव्वदच्या दशकात कित्येक महिलांनी, मुलींनी घरच्यांचा रोष पत्करुन आधी उस्तुकतेपोटी, नंतर आवड किंवा छंद म्हणून अनेक डोंगरवाटा पालथ्या घातल्या आणि त्यानंतर एक ध्यास म्हणून गिर्यारोहणात आपला ठसा उमटवला. हेच सारं डोळ्यासमोर ठेवून आपण १५ वे गिरिमित्र संमेलन घेऊन येत आहोत. ‘गिर्यारोहण आणि महिला’ ही यंदाच्या गिरिमित्र संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. १९७२ पासून गिर्यारोहण क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या चंद्रप्रभा ऐतवाल ते अगदी कालपरवाच्या पूर्णा मालवथपर्यंत अनेक नामवंत महिला गिर्यारोहक संमेलनास उपस्थित राहतील. विशेष म्हणजे या वर्षीच्या संमेलनाच्या आयोजनाची बहुतांश जबाबदारी प्रामुख्याने महिलांच्याच खांद्यावर असेल. 
 
देशात महिला  गिर्यारोहणाचा पाया ज्यांनी रचला त्या पद्मश्री चंद्रप्रभा ऐतवाल संमेलनाच्या अध्यक्षपदी असणार आहेत. तर संमेलनाच्या उद्घाटक असतील एव्हरेस्टवर दोन वेळा आरोहण करणाऱ्या पहिल्या महिला गिर्यारोहक पद्मश्री संतोष यादव. पोलीस दलात आपल्या कार्यकर्तुत्त्वाने स्वत:चा वेगळा ठसा उमटविणाºया ठाणे पोलिस उपायुक्त (वाहतूक) डॉ. रश्मी कंरदीकर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. अंशु जामसेनपा, सुमन कुटीयाल आणि मालवथ पूर्णा या तिनही एव्हरेस्टवीर महिला विशेष अतिथी असतील. आजवर तीन वेळा एव्हरेस्टवर यशस्वी आरोहण केलेल्या अंशु जामसेनपा यांनी त्यापैकी दोन आरोहणं तर एकाच मोसमात, केवळ दहा दिवसांच्या कालावधीत केली आहेत. पूर्णा मालवथ हीने वयाच्या तेराव्या वर्षीच एव्हरेस्टवर आरोहण करुन सर्वात कमी वयात एव्हरेस्टवीर होण्याचा विक्रम केला आहे. या सर्वांची संमेलनातील उपस्थित महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्राच्या अनुषंगाने नक्कीच प्रेरणादायी ठरेल.  
 
पाहुण्या गिर्यारोहकांच्या मोहिमांचे अनुभव हे त्यांच्या सादरीकरणातून, तसेच थेट संवादातून उलगडणार आहेत. पण त्याचबरोबर राज्य आणि देशपातळीवरील महिलांच्या गिर्यारोहण कर्तुत्त्वाचा आढवा देखील आपण घेणार आहोत. महाराष्ट्रात या खेळाचा विकास झाला तो संस्थांच्या पातळीवर. ९० च्या दशकातील अनेक संस्थांमधील महिला आजदेखील कार्यरत आहेत. केवळ एव्हरेस्टचा ध्यास न घेता गेली तीसचाळीस वर्षे या महिलांचं संस्थात्मक योगदान महत्त्वाचं आहे. या सर्व घडामोडींचा आढावा संमेलनात घेण्यात येणार आहे. यानिमित्ताने महिलांचा गिर्यारोहणातील सहभाग, त्यांची वाटचाल आणि सद्यास्थिती असा सर्वांगीण आढावा घेतला जाईल. एकूणच आजच्या काळातील महिलांचा या क्रिडा प्रकाराकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि भविष्यातील वाटचालींवर यानिमित्ताने प्रकाश तर टाकता येईलच, पण त्याचबरोबर या विषयाचे दस्तावेजीकरणदेखील त्यातून घडणार आहे. दिनांक ९ व १० जुलै रोजी होणाऱ्या या दिड दिवसाच्या कार्यक्रमात महिला गिर्यारोहकांच्या अनुभवाचा आनंद दृकश्राव्य सादरीकरणातून मिळणार आहेच, पण त्यांच्याशी खुला संवाददेखील साधता येईल.
 
सविस्तर माहिती girimitra.org या वेबसाईटवर देण्यात आली आहे.