"माझ्या नजरेने पाहिले तर, काही नाही घातलं तरी महिला चांगल्या दिसतात"- रामदेव बाबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 15:57 IST2022-11-25T15:06:02+5:302022-11-25T15:57:37+5:30

बाबा रामदेव यांच्या महिलांवरील वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

'...Women look good even if they don't wear anything', Ramdev Baba's statement in front of Amrita Fadnavis | "माझ्या नजरेने पाहिले तर, काही नाही घातलं तरी महिला चांगल्या दिसतात"- रामदेव बाबा

"माझ्या नजरेने पाहिले तर, काही नाही घातलं तरी महिला चांगल्या दिसतात"- रामदेव बाबा

ठाणे: नेहमी आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असणारे पतंजलीचे प्रमुख योगगुरू बाबा रामदेव यांनी महिलांबाबत एक वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे. पतंजलीच्या मोफत योग शिबिरात बोलत असताना बाबा रामदेव म्हणाले की, 'महिला साडीमध्ये छान दिसतात, सलवार-सुटमध्येही(पंबाजी ड्रेस) छान दिसतात. आणि माझ्या नजरेने पाहिले तर, काही घातले नाही तरी छान दिसतात.' 

विशेष म्हणजे, बाबा रामदेव यांनी हे वक्तव्य केले, तेव्हा मंचावर त्यांच्या शेजारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदें उपस्थित होते. आता रामदेव बाबांच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

यावेळी बाबा रामदेव यांनी अमृता फडणवीस यांचे कौतुक केले. अमृता फडणवीस हिशोबात अन्न ग्रहण करतात. पुढील शंभर वर्षे त्या म्हाताऱ्या होणार नाहीत. याचे कारण म्हणजे, त्या नेहमी आनंदी राहतात, असं बाबा रामदेव म्हणाले. तसेच, जसा आनंद अमृता फडणवीस यांच्या चेहऱ्यावर असतो, तसाच आनंद मला तुमच्या(उपस्थित महिला) चेहऱ्यावर पाहायचा आहे, असंही ते म्हणाले.

Read in English

Web Title: '...Women look good even if they don't wear anything', Ramdev Baba's statement in front of Amrita Fadnavis