आकुर्डीत इंद्रायणी एक्स्प्रेसच्या धडकेने महिला ठार

By Admin | Updated: June 23, 2016 16:40 IST2016-06-23T14:40:30+5:302016-06-23T16:40:13+5:30

पुण्याहून मुंबईकडे जाणा-या इंद्रायणी एक्स्प्रेस रेल्वेखाली सापडून आकुर्डी येथे एका ५५ वर्षे वयाच्या महिलेचा जागीच मृत्यू झाला.

Women killed by a trauma of Indrayani Express in Akurdi | आकुर्डीत इंद्रायणी एक्स्प्रेसच्या धडकेने महिला ठार

आकुर्डीत इंद्रायणी एक्स्प्रेसच्या धडकेने महिला ठार

ऑनलाइन लोकमत

पिंपरी, दि. २३ - पुण्याहून मुंबईकडे जाणा-या इंद्रायणी एक्स्प्रेस रेल्वेखाली सापडून आकुर्डी येथे एका ५५ वर्षे वयाच्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली. मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. 

लोहमार्ग पोलीस पुरुषोत्तम कर्दळे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना बुधवारी रात्री आकुर्डी रेल्वे स्थानकाच्या हद्दीत घडली. रेल्वे रुळ ओलांडत असताना हा अपघात झाला. गेल्या दोन महिन्यात आकुर्डी, पिंपरी आणि कासारवाडी रेल्वे स्थानकाच्या हद्दीत रूळ ओलांडताना अपघातात बळी पडण्याच्या चार घटना घडल्या आहेत.       

Web Title: Women killed by a trauma of Indrayani Express in Akurdi