शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात गेला तरुणीचा भूकबळी

By admin | Updated: November 1, 2015 00:58 IST

आई देवाघरी गेलेली... दुसरे लग्न केलेल्या पित्याने नाशिकमध्ये वास्तव्य केले... तीन मुलींपैकी एकीच्या मृत्यूनंतर दुसरीनेही साथ सोडत मुंबई गाठली. घरात एकट्याच राहणाऱ्या

- रेवणसिध्द जवळेकर, सोलापूर

आई देवाघरी गेलेली... दुसरे लग्न केलेल्या पित्याने नाशिकमध्ये वास्तव्य केले... तीन मुलींपैकी एकीच्या मृत्यूनंतर दुसरीनेही साथ सोडत मुंबई गाठली. घरात एकट्याच राहणाऱ्या तिसऱ्या बहिणीला अनेक दिवसांपासून अन्न न मिळाल्याने ती भूकबळीची शिकार ठरली. सोलापुरच्या होटगी रोडवर ही हृदयद्रावक घटना घडली.
वैशाली अनिल भगत (२४) असे तिचे नाव आहे. अनिल भगत हे आपली पत्नी आणि तीन मुलींसमवेत औद्योगिक वसाहतीत राहत होते. पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले आणि नाशिकमध्ये दुसऱ्या पत्नीबरोबर राहायला गेले.
तिन्ही मुली मात्र त्यांच्याबरोबर न जाता औद्योगिक वसाहतीतील लहान खोलीतच राहू लागल्या. काही महिन्यांपूर्वी त्यापैकी बहिणीचा मृत्यू झाला.
तर दुसरी बहीण आरती ही वैशालीला सोडून मुंबईत स्थायिक झाली. एकाकी पडलेली वैशाली ही विमनस्क अवस्थेत जगत होती. त्यातूनच तिची उपासमार झाली. अधून-मधून ती औद्योगिक पोलीस चौकीत जाऊन ‘त्याला अटक करा, याला अटक करा’ अशी बडबड करायची. पोलीस तिला पैसे देत असत, मात्र ते ती घेत नसे. त्यामुळेच तिची उपासमार झाली.
वैशालीवर उपासमारीची वेळ आल्याची माहिती आसरा चौकातील खालिद सालार, मुन्नाभाई शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लागली. त्यांनी दोन महिने तिला दोन वेळचा डबा पोहोचवला. नंतर ते इतर कामांमध्ये गुंतल्याने वैशालीची पुन्हा उपासमार सुरू झाली.

तिच्या मृत्यूची वार्ता अशी समजली
मुंबईत राहणारी बहीण आरतीने शनिवारी दुपारी सोलापुरातील मित्र अब्दुल रब डोका यास भ्रमणध्वनी करून वैशालीकडे जाऊन विचारपूस करण्याबरोबर तिला २०० रुपये देण्याची विनंती केली. त्यानुसार डोका वैशालीच्या घराजवळ येताच त्याला बंद घरातून सडलेल्या प्रेताची दुर्गंधी आली. घराचा दरवाजा तोडला असता वैशाली मृतावस्थेत पडली होती. त्यानंतर त्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली.