शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

महिलेने अडविला मुख्यमंत्र्यांचा ताफा

By admin | Updated: September 7, 2015 01:21 IST

मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात रविवारी एका महिलेने त्यांच्या वाहनांचा ताफा अडविला, मात्र घटनास्थळी देवेंद्र फडणवीस यांची गाडी येताच ते गाडीतून उतरले आणि त्यांनी महिलेची व्यथा समजून घेतली

सोलापूर : मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात रविवारी एका महिलेने त्यांच्या वाहनांचा ताफा अडविला, मात्र घटनास्थळी देवेंद्र फडणवीस यांची गाडी येताच ते गाडीतून उतरले आणि त्यांनी महिलेची व्यथा समजून घेतली. साडेचार वाजता मुख्यमंत्र्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येत होता़ पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ताफा येताच भारती कोळी एका गाडीसमोर आल्या, चालकाच्या प्रसंगावधानामुळे त्या वाचल्या. त्यानंतर पोलिसांची धावपळ सुरू झाली़ पोलिसांनी त्यांना बाजूला केले. तेवढ्यात मुख्यमंत्र्यांची गाडी पुढे आली़ मुख्यमंत्री तेथेच उतरले़ त्यांनी कोळी यांच्याशी संवाद साधला. २००९ मध्ये महादेव कोळी जमातीच्या जातीचा दाखला अवैध ठरविल्यामुळे शिक्षिकेची नोकरी गेल्याचे कोळी यांनी सांगितले. त्यावर महादेव कोळी समाजाकडे जातीचा दाखला नसल्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत़ त्यांना सेवेत घेण्याबाबत विचार करु़ सध्या जे नोकरीला आहेत त्यांच्या दाखल्याबाबत कोणताही निर्णय न घेता स्थगिती द्यावी, असा आदेश दिला असल्याचे फडणवीस यांनी त्यांना सांगितले. (प्रतिनिधी)दुष्काळाचा आढावामुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्यात पाहणी करुन दुष्काळाचा आढावा घेतला. अधिकारी व लोकप्रतिनिधींकडून त्यांनी टंचाईची माहिती घेतली. दुष्काळ पचविण्याचीशक्ती द्यावीअमृत पिण्यासाठी सर्वजन पुढे येतात़ पण भगवान शंकराने समाजाला विषमुक्त करण्यासाठी विष पचविले होते़ आता आमच्यावर दुष्काळाचे संकट आले आहे़ ते संकट दूर करण्यासाठी परमेश्वराने आम्हाला शक्ती द्यावी, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील संजीवनी बेटावर डॉ़ सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या ७९ व्या श्रावणमास तपोनुष्ठान मौनमुक्तीच्या सांगता सोहळ्यास ते प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.