Santosh Deshmukh: सरपंच हत्या प्रकरणातील मास्टरमाईंडचा शोध लागणार?; तपास आता थेट CID पोलीस महासंचालक करणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 19:56 IST2024-12-19T19:55:22+5:302024-12-19T19:56:20+5:30

या हत्या प्रकरणाची पाळंमुळं खणून काढली जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Will the mastermind in the Sarpanch murder case be found The investigation will now be directly conducted by the CID Police Director General | Santosh Deshmukh: सरपंच हत्या प्रकरणातील मास्टरमाईंडचा शोध लागणार?; तपास आता थेट CID पोलीस महासंचालक करणार!

Santosh Deshmukh: सरपंच हत्या प्रकरणातील मास्टरमाईंडचा शोध लागणार?; तपास आता थेट CID पोलीस महासंचालक करणार!

Beed Sarpanch Murder Case ( Marathi News ):बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला १० दिवस उलटून गेल्यानंतरही सातपैकी तीन आरोपी अजूनही फरार आहेत. तसंच या हत्या प्रकरणात अद्याप मास्टरमाईंडवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाच नाही, असा आरोप विविध नेत्यांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येणार असून तपासाची कार्यकक्षा गृहविभाग ठरवणार असल्याची माहिती आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाने बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचं दाहक वास्तव राज्यासमोर आलं आहे. टोळक्याने सरपंच देशमुख यांचे अपहरण करून क्रूर हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे काही पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपींना सहकार्य केल्याचं उघड झालं असून एका पोलीस उपनिरीक्षकाला निलंबितही करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर हत्या प्रकरणाचा सखोल तपास होणं गरजेचं आहे. पोलिसांवर कोणता राजकीय दबाव होता का, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे आता सीआयडी पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वात गठित होणाऱ्या समितीकडून या प्रकरणाची पाळंमुळं खणून काढली जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आरोपींच्या शोधासाठी तीन पोलीस पथके 

हत्या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडी करत आहे. त्यांना बीड पोलीसही आरोपी शोधण्यासाठी मदत करत आहेत. अधिवेशनातही हत्यासह जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे बीड पोलीस आरोपी शोधण्यासाठी धावपळ करत आहेत. या प्रकरणात तीन पथके तपासासाठी नियुक्त केलेले आहेत, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिली.


आतापर्यंत कोण अटक अन् कोण फरार ? 

सरपंच हत्या प्रकरणात जयराम माणिक चाटे (वय २१, रा. तांबवा, ता. केज), महेश सखाराम केदार (२१, रा. मैंदवाड, ता. धारूर), सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे (दोघे, रा. टाकळी, ता. केज), कृष्णा आंधळे (रा. मैंदवाडी, ता. धारूर), विष्णू चाटे, असे आरोपी आहेत. यातील जयराम, महेश आणि प्रतीकला यापूर्वीच अटक केली होती. बुधवारी विष्णू चाटे यालाही अटक केली. अजून सुदर्शन घुलेसह सुधीर आणि कृष्णा हे तिघेही फरार आहेत.

Web Title: Will the mastermind in the Sarpanch murder case be found The investigation will now be directly conducted by the CID Police Director General

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.