दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा एकत्र होणार का? सुनील तटकर म्हणाले, 'तसा विषय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 17:02 IST2025-06-06T16:59:48+5:302025-06-06T17:02:50+5:30

शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचीही दोन शकले झाली आहेत. अजित पवारांना मूळ राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि चिन्ह मिळालं आहे. तर शरद पवारांच्या नेतृत्वाखालील पक्षाला नवीन नाव आणि चिन्ह मिळालेले आहे.

Will the ajit pawar sharad pawar reconciliation? Sunil Tatkar said, That's the topic | दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा एकत्र होणार का? सुनील तटकर म्हणाले, 'तसा विषय..."

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा एकत्र होणार का? सुनील तटकर म्हणाले, 'तसा विषय..."

Ajit Pawar Sharad Pawar News: गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार यांची चर्चा सुरू आहे. राजकीय वर्तुळातूनही या चर्चांना नेत्यांकडून हवा दिली जात आहे. अशातच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यातच वर्धापन दिन साजरा करणार आहे. याचबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दोन्ही पक्षाचा एकत्र मेळावा होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. 

उत्तर देताना सुनील तटकरे म्हणाले, "मी सांगितलं की, तसा विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुढे नाहीये. तसा प्रस्ताव नाही. तशी चर्चाही नाहीये. त्यामुळे तसं संभवत नाही."

वाचा >>"महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

गेला काही महिन्यात शरद पवार आणि अजित पवार हे कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसत आहेत. त्यांच्यातील बैठका वाढल्या आहेत. याबद्दलही तटकरेंना प्रश्न विचारण्यात आला. 

दोन्ही पवार भेटतात, त्यात वावगं नाही

तटकरे यांनी सांगितले की, "शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील ज्या बैठका होत आहेत, त्या प्रामुख्याने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, एआयच्या वापराबद्दल, रयत शिक्षण संस्था यासंदर्भात ते भेटत असतात. त्यात वावगं वाटण्याचं काही कारण नाही", असे उत्तर तटकरेंनी दिले. 

उगीच वाद काढू नको, अजित पवारांनी वर्धापन दिनाबद्दल काय दिले उत्तर?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यामुळे शरद पवारांच्या गटाला नवीन नाव आणि चिन्ह मिळाले. पण, त्यांच्या पक्षाकडूनही २६वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. याबद्दल अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. 

अजित पवार म्हणाले, "राष्ट्रवादीची स्थापनाच १० जून १९९९ ला झालेली आहे. त्यामुळे दोघांचाही वर्धापन दिन २६वाच येणार ना? उगीच कुठले तरी वाद काढू नको. मी काही त्याला उत्तर देणार नाही. त्यांनाही वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार आहे. आणि मलाही अधिकार आहे", असे उत्तर अजित पवारांनी दिले.  

Web Title: Will the ajit pawar sharad pawar reconciliation? Sunil Tatkar said, That's the topic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.