Will lockdown be imposed in maharashtra health minister Rajesh Tope says Thackeray government's intention | महाराष्ट्रात लॉकडाउन लागणार की नाही? राजेश टोपेंनी सांगितला ठाकरे सरकारचा 'इरादा'

महाराष्ट्रात लॉकडाउन लागणार की नाही? राजेश टोपेंनी सांगितला ठाकरे सरकारचा 'इरादा'


मुंबई - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या लॉकडाउनची चर्चा सुरू आहे. यातच, महाराष्‍ट्रात लॉकडाउनची स्थिती नश्चितपणे निर्माण होत आहे. मात्र, सध्या लॉकडाउन करण्याचा राज्य सरकारचा इरादा नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी म्हटले आहे. ते आजतक या वृत्त वाहिनीशी बोलत होते. (Will lockdown be imposed in maharashtra? health minister Rajesh Tope says Thackeray government's intention)

टोपे म्हणाले, जेव्हा आवश्यक साधने, जसे ऑक्‍सीजन, व्हेंटिलेटर्स, ICU बेड आदिंची कमतरता पडू लागते, तेव्हा लॉकडाउनची आवश्यकता पडत असते. अशात 3 आठवड्यांचा लॉकडाउन करून संक्रमणाची चैन तोडली जाऊ शकते. मात्र, राज्यात सध्या अशी परिस्थिती नाही आणि नाइट कर्फ्यू आणि विकेंड लॉकडाउनने या स्थितीवर नियंत्र मिळविता येऊ शकते.

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

महाराष्‍ट्रातील लशींच्या कमतरतेवर बोलताना टोपे म्हणाले, राज्यात कोरोना लसीकरणाचा वेग देशात सर्वात जास्त आहे. यामुळे प्रत्येक महिन्याला 1 कोटी 60 लाख लशींची आवश्यकता आहे. मात्र, अद्याप केवळ 1 कोटी 04 लाख लशीच दिल्या गेल्या आहेत. राज्यात 120 सेंटर्स आहेत, यांपैकी 70 बंद आहेत. कारण लशी संपल्या आहेत. लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. अनेक सुविधा असूनही लोकांना लस देणे अशक्य होत आहे.

केंद्र सरकारकडून सर्वाधिक लशी महाराष्ट्रालाच देण्यात आल्या आहेत. मात्र, असे असतानाही महाराष्ट्रातूनच लशींच्या कमतरतेची तक्रार आली आहे. यावर टोपे म्हणाले, महाराष्ट्राची तुलना गुजरात अथवा राजस्थानसोबत केली जाऊ शकत नाही. लोकसंख्या अथवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राची तुलना छोट्या राज्यांशी होऊ शकत नाही. कारण सर्वाधिक केसलोड याच राज्यावर आहे. मात्र, जेव्हा देशातील एकूण कोरोनाबाधितांपैक्षा 60 टक्के कोरोनाबाधित एकट्या महाराष्ट्राचे असतील, तर लशीही त्याच प्रमाणात भेटायला हव्यात.

कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही घातक; माणूस राहिला तरच आस्था टिकेल; रमजानवर योगी म्हणाले...

ताजी आकडेवारी देत टोपे म्हणाले, गुजरातला 16 लाख, हरियाणाला 24 लाख, उत्‍तरप्रदेशला 45 लाख, कनार्टकाला 29 लाख तर महाराष्‍ट्राला केवळ 17 लाख लशीच दिल्या जात आहेत. याच बरोबर, केंद्र सरकारने मुबलक मदत केली आहे, मात्र डिमांड ड्राइव्ह पुरवठा नाही. राज्यात 1 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. त्यामुळे लशींची मागणी अधिक आहे, असेही टोपे म्हणाले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Will lockdown be imposed in maharashtra health minister Rajesh Tope says Thackeray government's intention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.