कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही घातक; माणूस राहिला तरच आस्था टिकेल; रमजानवर योगी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 03:32 PM2021-04-11T15:32:21+5:302021-04-11T15:34:15+5:30

मुख्यमंत्री  योगी म्हणाले, यासंदर्भात आपण उद्या अथवा परवा धर्मगुरूंशी चर्चा करणार आहोत. मानवी जीवनाला प्राधान्य दिले जाईल. एवढेच नाही, तर कोरोनाला रोखण्यासाठी नियमांचे पालन करावेच लागेल. कोरोना व्हायरसची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षाही अधिक घातक आहे.

UP coronavirus CM Yogi on Ramadan lockdown says do not gather more than 5 people in any religious place | कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही घातक; माणूस राहिला तरच आस्था टिकेल; रमजानवर योगी म्हणाले...

कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही घातक; माणूस राहिला तरच आस्था टिकेल; रमजानवर योगी म्हणाले...

Next


लखनौ - कोरोनाने संपूर्ण देशातच हाहाकार घातला आहे. याच पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ (CM Yogi) यांनी म्हटले आहे, की माणूस राहिला, तरच आस्था व्यक्त करू शकेल. मणूस आहे, म्हणून आस्था आहे. आस्थेमुळे माणूस नाही. रमजानसह इतर सनांसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणणाले, माणूस वाचला तर आस्था टिकेल. त्यामुळे कुठलेही धर्मिक स्थळ असो, तेथे पाच हून अधिक लोकांनी एकत्र येऊ नये. योगी एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. (UP coronavirus CM Yogi on Ramadan lockdown says do not gather more than 5 people in any religious place)

मुख्यमंत्री  योगी म्हणाले, यासंदर्भात आपण उद्या अथवा परवा धर्मगुरूंशी चर्चा करणार आहोत. मानवी जीवनाला प्राधान्य दिले जाईल. एवढेच नाही, तर कोरोनाला रोखण्यासाठी नियमांचे पालन करावेच लागेल. कोरोना व्हायरसची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षाही अधिक घातक आहे. आम्हाला पहिल्या लाटेचा अनुभव आहे. त्यामुळे आम्ही व्यापक रणनीती तयार केली आहे. सर्व कोरोना नियमांचे पालन करून सण आणि उत्सव साजरे करा. 

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

लशीवरून सुरू असलेल्या राजकारणावर बोलताना योगी म्हणाले, उत्तर प्रदेशात लशीची कमतरता नाही. देशात जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम सुरू आहे. उत्तर प्रदेशात 6 हजार केंद्रांतून लसीकरण सुरू आहे. लस वाया जाऊ नये म्हणून नियोजन केले जात आहे. 

लशीच्या कमतरतेवर बोलताना योगी म्हणाले, नियोजनाच्या पातळीवर राज्य सरकारांच्या शिथीलतेमुळेच ही समस्या निर्माण झाली असेल. अन्यथा लस मुबलक प्रमाणावर उपलब्ध आहेत. मुख्यमंत्री योगी म्हणाले, लशीची नासधूस जेवढी कमी होईल तेवढीच ती अधिक लोकांना दिली जाईल, असा आमचा प्रयत्न आहे.

लॉकडाउनच्या प्रश्नावर योगी म्हणाले, राज्यात लॉकडाउनची आवश्यकता नाही. जेथे 500 हून अधिक रुग्ण आहेत अथवा जेथे रोज 100 हून अधिक रुग्ण आढळत आहेत. अशा ठिकाणी नाइट कर्फ्यू लावण्यात यावा. तसेच या काळात आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरूच रहावा.

Corona Updates Mumbai: मुंबईत उभारले जाणार चार नवे 'जम्बो कोविड सेंटर'; राज्य सरकारचं महत्वाचं पाऊल!

शाळा महाविद्यालये बंद -
योगी म्हणाले, आम्ही बेसिक आणि माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये 20 एप्रिलपर्यंत बंद केली आहेत. क्लब आणि कोचिंग बंद करण्यासही सांगण्यात आले आहे. याशिवाय, बंद सभागृहांत 50 हून अधिक आणि मोकळ्या जागी 100 हून अधिक लोकांनी एकत्रित येऊ नये. तसेच सर्वांनी मास्कचा वापर करायला हवा.

Web Title: UP coronavirus CM Yogi on Ramadan lockdown says do not gather more than 5 people in any religious place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.