शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

"फडणवीस सरकारच्या काळातील डिजिटल दलाली उघड करणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 07:35 IST

कमनशिबी कोण याचे उत्तर मोदींनी द्यावे

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांनी भ्रष्टाचारासाठी सॉफ्टवेअर तयार केल्याच्या, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस सरकारच्या काळात डिजिटल दलाल होता. त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळात काय- काय घोटाळे झाले, हे लवकरच बाहेर काढू, असा इशारा मलिक यांनी माध्यमांशी बोलताना दिला.नवाब मलिक यांनी रविवारी केंद्र सरकारसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत विविध प्रश्नांची सरबत्ती केली. इंधन दरवाढ, महागाई, शेतकरी आंदोलन, जम्मू-काश्मिरातील वाढते दहशतवादी हल्ले आदी मुद्द्यांवर मलिक यांनी भाजपवर टीका केली. केंद्र सरकारने यंत्रणांचा गैरवापर केला असता, तर महाविकास आघाडी सरकारचे निम्मे मंत्रिमंडळ तुरुंगात गेले असते, या फडणवीस यांच्या विधानावर मलिक म्हणाले की, अर्धेच काय, संपूर्ण मंत्रिमंडळ तुरुंगात जायला तयार आहे. हिंमत असेल तर टाकून दाखवा. दिल्लीसमोर आम्ही झुकणार नाही, असे मलिक म्हणाले. तसेच, देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दराने शंभरी पार केली. युपीए सरकारच्या ६० रुपयांवर दर गेल्यावर भाजपने संसद चालू न देण्याची भूमिका घेतली. केंद्रात भाजपची सत्ता आल्यावर नरेंद्र मोदी यांनी, माझ्या नशिबाने कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याचे विधान केले होते. आता, कुणाच्या नशिबाने दर वाढत आहेत, कोण कमनशिबी आहे, याचे उत्तर मोदी यांनी द्यावे, असे ते म्हणाले. काश्मीरमधील परिस्थिती का सुधारत नाही?जम्मू-काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्यांसंदर्भात मलिक म्हणाले की, सात वर्षांपासून भाजपकडे केंद्राचे सरकार आहे. तर दोन वर्षांपासून काश्मीरमध्ये सरकार चालवत आहेत. त्यापूर्वी काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत भाजपचीच सत्ता होती. मग तरीही परिस्थिती का सुधारत नाही, याचे उत्तर भाजपने जनतेला द्यावे. लोकांची हत्या होत आहेच, लोक जम्मू-काश्मीर सोडून पलायन करत आहेत. आतंकवादी हल्ले थांबत नाहीत. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा संपवूनही दहशतवादी कारवाया का थांबत नाहीत, असा सवाल करतानाच, केवळ प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार संघाला नाही, असेही मलिक म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnawab malikनवाब मलिक