विकासासाठी कटिबद्ध राहणार- सोले

By Admin | Updated: June 15, 2014 00:40 IST2014-06-15T00:40:09+5:302014-06-15T00:40:09+5:30

महापौरपदावर कार्य करताना आरोग्य आणि शिक्षण सेवेत सुधारणा घडवून नागनदीची स्वच्छता, शहरात हरितक्रांतीची योजना, वृक्षारोपण, तलावांना निर्माल्यमुक्त करणे आदी कामे तडीस नेली.

Will be committed to development- Solve | विकासासाठी कटिबद्ध राहणार- सोले

विकासासाठी कटिबद्ध राहणार- सोले

सहा जिल्ह्यांचा दौरा : पदवीधरांना मागितले समर्थन
नागपूर : महापौरपदावर कार्य करताना आरोग्य आणि शिक्षण सेवेत सुधारणा घडवून नागनदीची स्वच्छता, शहरात हरितक्रांतीची योजना, वृक्षारोपण, तलावांना निर्माल्यमुक्त करणे आदी कामे तडीस नेली. यानंतरही भविष्यात विकासकामांसाठी कटिबद्ध राहू, असे आश्वासन पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपाइं महायुतीचे उमेदवार प्रा. अनिल सोले यांनी दिले.
पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अनिल सोले यांनी विभागातील सहा जिल्ह्यांचा दौरा केला. यावेळी त्यांनी महापौर म्हणून काम करताना केलेल्या विकासकामांची माहिती देऊन नागपूर शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण, सिमेंटचे रस्ते तयार करून शहराला वाहतुकीसाठी सुलभ रस्ते तयार करून दिल्याचे सांगितले.
याशिवाय इंदोरा दहीबाजार पुलाचे काम जलदगतीने पूर्ण करून हा पूल नागरिकांना वाहतुकीसाठी खुला केल्याचे सांगितले.
या विकासकामांमुळे नागपूर शहराला देशातील सर्वात सुंदर शहर म्हणून पदक प्राप्त झाले असून भविष्यात विकासकामांसाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. अनिल सोले यांनी नागपूर विद्यापीठ परिसर, लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट, डब्लुसीएल, वनविभाग, दूरदर्शन, दूरसंचार विभाग, सरकारी प्रेस, महाराष्ट्र स्टेट बोर्ड आॅफिस, शिक्षकांचा अभ्यासवर्ग, सीपीडब्ल्यूडी विभाग, पूर्व नागपूर, उत्तर नागपूर, दक्षिण नागपूर आदी परिसराचा दौरा केला.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत पवार यांनी महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. गजेंद्र बडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यकारिणीच्या बैठकीत सोलेंना पाठिंबा जाहीर केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Will be committed to development- Solve