शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा खून करून पती पोलिसांच्या स्वाधीन

By admin | Updated: November 3, 2014 03:53 IST

सहा वर्षांपूर्वी लग्न झाल्यानंतर दोनच वर्षांत घटस्फोटासाठी न्यायालयात दावा दाखल करूनही एकत्र संसार करणाऱ्या रूपालीचा (२४) राजकुमार चव्हाण (२७) याने गळा आवळून खून केला.

ठाणे : सहा वर्षांपूर्वी लग्न झाल्यानंतर दोनच वर्षांत घटस्फोटासाठी न्यायालयात दावा दाखल करूनही एकत्र संसार करणाऱ्या रूपालीचा (२४) राजकुमार चव्हाण (२७) याने गळा आवळून खून केला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास आझादनगर भागात घडली. खून केल्यानंतर तो स्वत:च पोलिसांच्या स्वाधीन झाल्यानंतर त्याला अटक केल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली.रूपाली आणि राजकुमार यांचा विवाह २००८ मध्ये झाला होता. त्यांना सहा वर्षांची सोनल ही मुलगीही आहे. दोघांमध्ये अनेकदा क्षुल्लक कारणावरून भांडणे होत होती. पती मारहाण तसेच शिवीगाळ करतो, अशी तक्रारही तिने कापूरबावडी पोलीस ठाण्यात २०१० मध्ये दाखल केली होती. त्यांनी २०१० मध्ये भिवंडी न्यायालयात घटस्फोटासाठी दावा दाखल केला होता. तो प्रलंबित आहे. मात्र, तरीही आपसात समझोता करून ते दोघेही एकत्र संसार करीत होते. रुग्णवाहिकेवर चालक असलेला राजकुमार शनिवारी रात्री उशिरा घरी परतला, तेव्हा त्याने पत्नीला जेवायला वाढण्यास सांगितले. तिने त्याला स्वत: घेण्यास सांगितल्यानंतर त्यांच्यात पराकोटीचा वाद झाला. त्यातूनच संतप्त झालेल्या पतीने हाताने तिचा गळा आवळला. रविवारी पहाटे १.३०च्या सुमारास तो पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलीस निरीक्षक कृष्णा काटकर यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. त्याला ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. (प्रतिनिधी)