शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

५0 एसटी बसमध्ये चार दिवसांत वाय-फाय

By admin | Updated: September 15, 2016 03:27 IST

रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध केली जात असतानाच एसटी महामंडळानेही आपल्या सर्व प्रकारच्या बसमध्ये वायफाय बसवण्याचा निर्णय घेतला

मुंबई : रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध केली जात असतानाच एसटी महामंडळानेही आपल्या सर्व प्रकारच्या बसमध्ये वायफाय बसवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ५0 बसमध्ये वायफाय बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. येत्या चार दिवसांत सेवा सुरू होईल, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून एसटी बसमध्ये वायफाय सुरु करण्यासाठी एसटी महामंडळ प्रयत्नशील होते. त्याला अंतिम स्वरूप देत अखेर ५0 बसमध्ये वायफाय बसवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला. त्यानुसार पुण्याच्या शिवाजीनगर, स्वारगेटमधून सुटणाऱ्या शिवनेरी, हिरकणी आणि परिवर्तन बसमध्ये वायफाय बसवण्याचे काम सुरू केले आणि हे काम नुकतेच पूर्ण झाले. याबाबत एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी सांगितले की, साधारण एक महिन्यापूर्वी वायफाय बसवण्याचे काम सुरू केले होते व हे काम पूर्ण करण्यात आले आहे. आता ५0 बसमध्ये वायफाय कसे हाताळावे त्यासंदर्भातील माहितीचे स्टीकर्स बसवण्याचे काम सुरु आहे. हे काम पूर्ण होताच एसटीच्या १00 टक्के बसमध्ये वायफाय बसवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. वाय-फाय मिळविण्यासाठी स्मार्ट फोनमधील वाय-फाय सुविधा सुरू करणे आवश्यक आहे. त्यानुसार फोनमधील इंटरनेट ब्राऊझर अ‍ॅप उघडल्यानंतर त्यांनी कंपनीने दिलेला यूआरएल टाईप केल्यावर प्रवाशांची प्राथमिक माहिती विचारली जाईल त्यानंतर एक मेन्यू प्रवाशांच्या स्मार्ट फोनवर दिसेल. त्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपट व गाणी, बातम्या, लहान मुलांसाठी कार्टून चित्रपट, टीव्ही वाहिन्यांवरील गाजलेल्या मालिका असा मनोरंजनाचा खजिना उघडला जाईल. (प्रतिनिधी)