Kolhapur: प्रशांत कोरटकरवर अजूनही आरोपपत्र का नाही?, फिर्यादी इंद्रजित सावंत यांची पोलिसांना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 15:59 IST2026-02-18T15:58:03+5:302026-02-18T15:59:43+5:30

गुन्हा दाखल होऊन ११ महिने उलटले, छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ अवमान प्रकरण

Why is there still no charge sheet against Prashant Koratkar for making derogatory statements about Chhatrapati Shivaji Maharaj and Rajmata Jijau Complainant Indrajit Sawant's notice to the police | Kolhapur: प्रशांत कोरटकरवर अजूनही आरोपपत्र का नाही?, फिर्यादी इंद्रजित सावंत यांची पोलिसांना नोटीस

Kolhapur: प्रशांत कोरटकरवर अजूनही आरोपपत्र का नाही?, फिर्यादी इंद्रजित सावंत यांची पोलिसांना नोटीस

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना मोबाइलवरून धमकावल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याच्यावर गुन्हा दाखल होऊन ११ महिने उलटले आहेत. अजूनही त्याच्यावर आरोपपत्र का दाखल झाले नाही? अशी विचारणा करणारी नोटीस फिर्यादी सावंत यांनी बुधवारी (दि. १८) जुना राजवाडा पोलिसांना पाठवली. पोलिस कायदेशीर जबाबदारी पाळत नसतील तर न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशारा सावंत यांचे वकील असिम सरोदे यांनी दिला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

फिर्यादी सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'कोरटकर याच्यावर एक मार्च २०२५ रोजी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आठवडाभर शोध घेऊन पोलिसांनी त्याला तेलंगणा राज्यातून अटक केली. चौकशीनंतर त्याला जामीन मंजूर झाला. त्यानंतर महिनाभरात त्याच्यावर न्यायालयात आरोपपत्र दाखल होणे अपेक्षित होते.

मात्र, गुन्हा घडून ११ महिने झाले तरी त्याच्यावर आरोपपत्र दाखल झालेले नाही. सरकारमधील एक कट्टरवादी लॉबी त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. आरोपपत्र का दाखल केले नाही, याबाबत स्पष्टता नसल्याने जुना राजवाडा पोलिसांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.'

'जर पोलिस पारदर्शक भूमिकेतून त्यांची कायदेशीर जबाबदारी पाळत नसतील तर आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल,' असा इशारा सावंत यांचे वकील सरोदे यांनी दिला आहे. ॲड. श्रीया आवले, ॲड. योगेश सावंत, ॲड. हेमा काटकर, ॲड. सकलेन मुजावर यांनी पोलिसांना नोटीस पाठवली.

Web Title : कोल्हापुर: कोरटकर के खिलाफ आरोप पत्र क्यों नहीं?, शिकायतकर्ता ने पुलिस को नोटिस दिया।

Web Summary : कोल्हापुर में, इंद्रजीत सावंत ने प्रशांत कोरटकर के खिलाफ आरोप पत्र दाखिल करने में देरी पर सवाल उठाया है, जिन पर अपमानजनक टिप्पणी और धमकी देने का आरोप है। प्राथमिकी दर्ज होने के 11 महीने बाद भी आरोप पत्र दाखिल नहीं किया गया है, जिससे सावंत ने पुलिस को नोटिस जारी कर अदालत में कार्रवाई की चेतावनी दी है।

Web Title : Kolhapur: Why no chargesheet against Koratkar?, Complainant serves notice to police.

Web Summary : In Kolhapur, Indrajit Sawant questions the delay in filing a chargesheet against Prashant Koratkar, accused of offensive remarks and threats. Despite 11 months passing since the FIR, no chargesheet has been filed, prompting Sawant to issue a notice to the police, warning of court action.