शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

... त्यामुळेच मी पुन्हा येईन नाही तर "परत येईन " असे म्हणतो : उदय सामंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 19:35 IST

प्रत्येक महाविद्यालयाचा कॅम्पस हा  तंबाखू आणि धुम्रपान मुक्त करण्याकडे मी लक्ष देणार आहे

पुणे : तुम्हाला मी पुन्हा येईन म्हणालो..अन् जर समजा पंधरा दिवसांत काही घडलं..आणि मी येऊ शकलो नाहीतर उगीच प्रॉब्लेम नको. त्यामुळे मी पुुन्हा येईन असे न म्हणता ''परत नक्की येईन '' असे ठामपणे सांगतो..उच्च व तंत्र शिक्षणमंत्रीउदय सामंत यांनी केलेल्या या टिप्पणीवर सभागृहात एकच हशा उडाला. तसेच त्यांनी हे माझे वाक्य कोणत्याही राजकीय अंगाने नाही म्हणत एकप्रकारे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ''मी पुन्हा येईन '' या वाक्याची जणू आठवणच करुन दिली.  

पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जनतेचे कामे करण्यासाठी आम्ही मंत्री होतो. पण मंत्री म्हणून काम करताना जर जनतेशी चांगला संवाद करू शकलो तर अनेक कामे सोपी होतात. तसेच विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची मानसिकता समजून घ्यायला हवी. प्रत्येक महाविद्यालयाचा कॅम्पस हा तंबाखू आणि धुम्रपान मुक्त करण्याकडे मी लक्ष देणार आहे. महाराष्ट्राला विकासाच्या पथावर घडवण्याचे काम आम्ही कार्यक्षम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली करणार आहोत. 

सामंत म्हणाले,  आम्ही रस्ते, उड्डाणपूल बांधू शकतो पण मानसिकता घडवण्याचे काम ज्याने त्याने केले पाहिजे. कुठलीही मानसिकता घडवण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात. डॉक्टरेट घेणाऱ्या आणि परदेशातून शिकायला येणाऱ्यांची संख्या देशात जास्त आहे. शरद पवार साहेबांनी राजकीय क्षेत्रात आणले असले तरी सध्या त्यांच्यासोबत नाही. त्यामुळे ज्यांच्यासोबत आहे आणि ज्यांच्यामुळे घडलो त्यांना विसरत नाही. अजित पवार एक कार्यक्षम मंत्री म्हणून काम करत आहेत. पोलिसांनी परवानगी नाकारली असताना देखील पुण्यात येऊन 1200 विद्यार्थ्यांना भेटलो. त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांचे सगळे प्रश्न मार्गी लावल्यानंतरच कुलगुरूंना भेटलो.

.....................

कॉलेजमध्ये येताना फार अडचण विद्यार्थी व पालकांची होते. त्यामुळे स्कायवॉक संबंधी काही निर्णय घेता येईल का ? या विद्यार्थिनीच्या प्रश्नाला सामंत उत्तर देताना म्हणाले, यासंबंधी मुंबई येथे आयोजित बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्तांशी बोलून लवकरात लवकर तो प्रश्न मार्गी लावण्यावर माझा भर असेल. तसेच सीओईपीला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळण्याबाबत काय सांगाल ? या दुसऱ्या प्रश्नावर या कामासाठी नियोजित समितीकडून जो निर्णय येईल त्याला माझा पाठिंबा असेल असे त्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :PuneपुणेUday Samantउदय सामंतEducationशिक्षणcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी