गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 15:45 IST2025-09-17T15:40:31+5:302025-09-17T15:45:22+5:30

Goa Manohar Parrikar And Maharashtra DCM Ajit Pawar: कोण पर्रीकर? असा प्रश्न विचारल्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली जात आहे. यातच दादा निरुत्तर झाल्याची चर्चाही रंगल्याचे म्हटले जात आहे.

why did deputy cm ajit pawar remain speechless when goa former cm manohar parrikar name was mentioned discussions are rife | गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण

गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण

Goa Manohar Parrikar And Maharashtra DCM Ajit Pawar: पुण्याच्या काही भागातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले होते. इथल्या समस्या बघता इथे राहायचे की नाही, हा प्रश्न आम्हाला पडला आहे, असे त्रस्त झालेल्या पुणेकर महिलेने सांगतानाच जसे गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर न सांगता रहदारीचा आढावा घ्यायचे तसेच तुम्ही फिर, असा सल्ला दिला. यावर अजित पवार म्हणाले की कोण पर्रीकर? त्यावर महिला म्हणाली की, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर दिवसा फिरायचे ट्रॅफिक बघण्यासाठी तसे तुम्ही कधीतरी ट्रॅफिकची वेळ असते, त्यावेळी येऊन बघायला पाहिजे, असे नाही की माहिती होऊ शकत नाही, असे महिलेने सांगितले. 

कोण पर्रीकर? उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सवाल, गोव्यातील भाजपा नेत्यांकडून समाचार; म्हणाले...

कोण पर्रीकर? असा प्रश्न करणाऱ्या अजित पवार यांच्यावर गोव्यातील नेत्यांनी टीका केली. तसेच पर्रीकर कोण होते, याचेही स्मरण करून दिले. कोण पर्रीकर, या अजित पवार यांच्या प्रश्नाचा गोव्यातील भाजपा नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला. मनोहर पर्रीकरांना कमी लेखणे किंवा ते माहिती नसणे म्हणणे, यातून महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या एका महत्त्वाच्या नेत्याचे राजकीय अज्ञान दिसून येते, असा पलटवार गोव्यातील भाजपा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केला. एकीकडे गोव्यातून टीका होत असताना दुसरीकडे पुण्यात मात्र मनोहर पर्रीकर यांचे नाव येताच दादा निरुत्तर का झाले असावे, याबाबत चौकांमध्ये कुजबुज सुरू असल्याचे म्हटले जात आहे. 

दादा निरुत्तर का झाले असावे?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याला भेट देऊन खराडी ते केशवनगर परिसरात पाहणी केली. यावेळी पुलाचे काम करताना अत्याधुनिक, दर्जेदार साहित्य वापरा, कामे गतीने पूर्ण करा, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. नागरिकांनी याच ठिकाणी त्यांची भेट घेऊन समस्या मांडल्या. तेव्हा त्यांनी कामासाठी उशीर झाल्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केली. तर एका पुणेकर महिलेने चक्क गोव्याचे मनोहर पर्रीकर यांच्याप्रमाणे अचानक येऊन पाहणी करा म्हणजे इथल्या खऱ्या समस्या समजतील, अशी सूचना त्यांना केली. यावर दादाही निरुत्तर झाले, कदाचित पहिल्यांदा.. अशी चर्चा पुण्याच्या चौकांमध्ये होत आहे.

दरम्यान, 'पर्रीकर कोण? असे विचारून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले राजकीय अज्ञान व्यक्त केले असावे किंवा ते वेड पांघरून पेडगांवला जात असावेत. पर्रीकरांचे कार्य सर्व जगाला ठाऊक आहे. मुख्यमंत्री तसेच केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून त्यांचे योगदान सर्वश्रुत आहे. मनोहर पर्रीकर हे केवळ गोव्याचेच नव्हे, तर देशाच्या राजकारणातील एक मोठे नाव होते. त्यांचे शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. ते एक कुशल प्रशासक आणि दूरदृष्टी असलेले नेते होते. मनोहर पर्रीकर हे असे व्यक्तिमत्व आहे, ज्यांच्या नावाने केवळ गोवाच नव्हे, तर देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ यासारख्या मोठ्या शहरांमध्येही अनेक संस्था आणि केंद्रे उभारण्यात आली आहेत, असे दामू नाईक म्हणाले.

 

Web Title: why did deputy cm ajit pawar remain speechless when goa former cm manohar parrikar name was mentioned discussions are rife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.