शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

भाजपाने सत्ता कशामुळे गमावली?; शरद पवारांनी 'मी पुन्हा येईन'ची गोष्ट सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 11:06 AM

लोकसभेच्या निवडणुकीत देशातील चित्र पाहून महाराष्ट्रानेही मतदान केलं. पण राज्याचा प्रश्न आला, तेव्हा वेगळा विचार केला.

मुंबईः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची सामनासाठी संजय राऊतांनी खास मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत पवारांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे फडणवीसांच्या मी पुन्हा येणार या घोषणेचा शरद पवारांनी खरपूस समाचार घेतला आहे. तसेच महाराष्ट्रात घडलेल्या घडामोडींवरही पवारांनी मत व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रात जे घडलं तो अपघात नव्हता. लोकसभेच्या निवडणुकीत देशातील चित्र पाहून महाराष्ट्रानेही मतदान केलं. पण राज्याचा प्रश्न आला, तेव्हा वेगळा विचार केला, असंही पवार म्हणाले आहेत. (Sharad Pawar Sanjay Raut Interview)मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, छत्तीसगड चित्र बदललं होतं. महाराष्ट्रातही चित्र बदलायचा मूड लोकांचा होता. गेली पाच वर्षं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायच्या आधी सेना आणि भाजपाचं सरकार होतं. पण सेनेच्या विचाराचा मतदार आणि सेनेचा कार्यकर्ता यांच्यात सरकारबद्दल अस्वस्थता होती. सेनेची काम करण्याची पद्धत ठोसपणानं गोष्ट राबवायची होती. भाजपाने त्यांना गप्प बसवण्याचा, बाजूला ठेवण्याची भूमिका सातत्यानं घेतली. महाराष्ट्रातल्या जनतेने जी पाच वर्षं पाहिली, ती भाजपाचं सरकार असल्याचीच होती. याच्याआधी असं नव्हतं. मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली युती सरकार होतं. नेतृत्व शिवसेनेकडे होते. बाळासाहेबांची भक्कम भूमिका होती. मागच्या पाच वर्षांत सेनेला जवळपास बाजूला केलं आणि भाजपा म्हणजे हेच खरे राज्यकर्ते आणि पुढच्या काळात भाजपाच्या विचारानेच चालणार ही भूमिका घेऊन पावलं टाकली. ही महाराष्ट्रातल्या जनतेला पटत नव्हती. दुसरं कुणी राजकारण करू शकत नाही, असं वाटत होतं, असं म्हणत पवारांनी भाजपावरही टीकास्त्र सोडलं आहे.   मी येणार, मी येणार आणि मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला. कुठल्याही राज्यकर्त्याने मीच येणार ही भूमिका घेऊन जनतेला गृहित धरायचं नसतं. मीच येणार ही भूमिका घेऊन मतदाराला गृहित धरलं तर तो सहन करत नाही. त्यात थोडासा दर्प आहे आणि धडा शिकवला पाहिजे, असं जनतेनं ठरवलं.  कुठल्याही लोकशाहीतला नेता अमरपट्टा घेऊन आलोय, असा विचार करूच शकत नाही. इंदिरा गांधींनाही पराभव पाहावा लागला, अटलबिहारी वाजपेयींनाही पराभव पाहावा लागला. राजकारणातल्या लोकांपेक्षा मतदार शहाणा आहे. चाकोरीच्या बाहेर पाऊल टाकतोय असं दिसलं तर तो धडा शिकवतो, असंही पवार म्हणाले आहेत. 105 ही फिगर झाली, त्यात शिवसेनेचं योगदान मोठं होतं. शिवसेना नसती तर १०५ चा आकडा 40-50 आसपास असता. 105 पर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांनाच गृहित धरलं, असंही शरद पवार म्हणाले आहेत. 

हेही वाचा

'हा' आहे बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमधला महत्त्वाचा फरक; शरद पवारांचं निरीक्षण

"...म्हणून लॉकडाऊनच्या दोन महिन्यांत बाळासाहेबांची आठवण आली": शरद पवार

लॉकडाऊनवरून उद्धव ठाकरेंशी मतभेद?; शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत

कोरोनाबरोबर जगायची तयारी असावी; तो दैनंदिन जीवनाचाच एक भाग- शरद पवार

CoronaVirus: मुंबईतल्या धारावी मॉडेलची जगभरातून प्रशंसा; जागतिक आरोग्य संघटनेनंही केलं कौतुक

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार