शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींचा खर्च कशासाठी?

By admin | Updated: July 28, 2014 01:27 IST

रेल्वेस्थानकावर होम प्लॅटफार्मसाठी रेल्वे प्रशासनाने नऊ कोटी रुपये खर्च केले. बदली होण्यापूर्वी तत्कालीन ‘डीआरएम’ बृजेश दीक्षित यांनी या प्लॅटफार्मचे लोकार्पणही केले. परंतु या प्लॅटफार्मवरून

होम प्लॅटफार्म ओसाड : अजून पाच वर्षे प्लॅटफार्मची गरज नसल्याचा खुलासाआनंद शर्मा - नागपूररेल्वेस्थानकावर होम प्लॅटफार्मसाठी रेल्वे प्रशासनाने नऊ कोटी रुपये खर्च केले. बदली होण्यापूर्वी तत्कालीन ‘डीआरएम’ बृजेश दीक्षित यांनी या प्लॅटफार्मचे लोकार्पणही केले. परंतु या प्लॅटफार्मवरून सुटणारी एकमेव दुरांतो एक्स्प्रेसही शेड नसल्यामुळे पावसाळ्यात बंद करण्यात आली. आता हा प्लॅटफार्म ओस पडला असून येथून भविष्यात जमले तर रेल्वेगाड्या चालवू, सध्याच या होम प्लॅटफार्मची गरज नव्हती, असे धक्कादायक विधान सध्याचे ‘डीआरएम’ ओ. पी. सिंह यांनी केले आहे.नागपुरातून सुटणाऱ्या आणि दपूम रेल्वेच्या गाड्यांसाठी आठवा होम प्लॅटफार्म साकारण्यात आला. काही दिवस दुरांतो एक्स्प्रेस येथून सोडल्यानंतर पावसाळ्यात शेड नसल्यामुळे ही गाडीसुद्धा दुसऱ्या प्लॅटफार्मवरून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या होम प्लॅटफार्मवरील लँडस्केपिंग, वॉटर पॅनलचे नुकसान होत आहे. येथे असामाजिक तत्त्वांच्या हालचाली वाढल्या आहेत. या बाबींची रेल्वे प्रशासनाने कुठलीच दखल घेतली नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या प्लॅटफार्मवरून रेल्वेगाड्या सोडण्यासंबंधी कुठलीच नोंद रेल्वेकडे नसल्याचा खुलासा सध्याचे ‘डीआरएम’ ओ. पी. सिंह यांनी केला आहे. परंतु तत्कालीन ‘डीआरएम’ बृजेश दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत होम प्लॅटफार्मवरून गाड्या सोडणार असल्याचे सांगितले होते. भविष्यात सेवाग्राम थर्डलाईन, कळमना डबलिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर होम प्लॅटफार्मवरून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या गाड्या सोडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. सध्याचे ‘डीआरएम’ ओ. पी. सिंह यांचा खुलासा आश्चर्यजनक आहे. त्यांच्या मते होम प्लॅटफार्मवरून रेल्वेगाड्या सोडण्याची कुठलीच नोंद रेल्वेकडे नसल्याने तेथून रेल्वेगाड्या सोडण्याचा कुठलाच कार्यक्रम सध्या नाही. भविष्यात होम प्लॅटफार्मवरून गाड्या सोडण्याचा विचार केला जाऊ शकतो. होम प्लॅटफार्मची अजून पाच वर्षे गरज नसल्याचे धक्कादायक विधानही त्यांनी केले.