शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त फोटो शेअर करणा-या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनला अटक

By admin | Updated: October 8, 2016 19:42 IST

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर भारत-पाकिस्तानमध्ये सध्या असलेल्या संबंधांबद्दल वादग्रस्त फोटो ग्रुपवर शेअर करणा-या अ‍ॅडमिनला पोलिसांनी अटक केली

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 8 - व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर भारत-पाकिस्तानमध्ये सध्या असलेल्या संबंधांबद्दल वादग्रस्त फोटो ग्रुपवर शेअर करून हिंदू-मुस्लिम धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करून भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी गौरवाड (ता. शिरोळ) येथील ग्रुप अ‍ॅडमिनला कुरुंदवाड पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपी मोहसिन मोझम कोल्हापुरे (वय ३०) असे त्याचे नाव आहे. शिरोळ तालुक्यात या घटनेचे जोरदार पडसाद उमटले. संतप्त तरुणांनी आरोपीच्या दुकानावर हल्ला चढवीत तोडफोड केली. 
 
अधिक माहिती अशी, मोहसिन कोल्हापुरे याचा न्यू कोल्हापुरे व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप आहे. त्याचा तो स्वत: अ‍ॅडमिन आहे. दि. ३ ऑक्टोबर रोजी त्याने आपल्या मोबाईलवरून ग्रुपवर फोटो शेअर केला. त्या फोटोत एक पक्षी दुसºया पक्ष्याची शिकार करीत होता. शिकारी पक्ष्याच्या पंखावर पाकिस्तानचा झेंडा छापलेला होता. सध्या भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या संबंधांबद्दल वादग्रस्त फोटो ग्रुपवर शेअर करून, हिंदू-मुस्लिम धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करून भारताच्या राष्ट्रध्वजाचा त्याने अपमान केला. हा प्रकार ग्रुपवरील सदस्य शुभम दिलीपकुमार कुंभाजे (२०, रा. गौरवाड) याच्या लक्षात आल्यानंतर त्याने कुरुंदवाड पोलिस ठाण्यात संशयित ग्रुप अ‍ॅडमिन मोहसिन कोल्हापुरे याच्याविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी कलम १५३,  ५०५ प्रमाणे गुन्हा दाखल केला. 
 
दरम्यान, या घटनेचे शिरोळ तालुक्यात पडसाद उमटले. संतप्त जमावाने कोल्हापुरे याच्या दुकानावर हल्ला चढवीत तोडफोड केली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ कारवाई करून जमावाला शांत केले. या संपूर्ण घटनेचा व तपासाचा अहवाल कुरुंदवाड पोलिसांनी पोलिस महासंचालकांना पाठविला आहे.