शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Gaurav Ahuja: गौरव आहुजाने माफी मागितलेले 'शिंदे साहेब' कोण? बडा राजकीय वरदहस्त असल्याच्या चर्चा, पुणेकरांना प्रश्न...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 09:52 IST

Gaurav Ahuja Crime News Pune: माजलेल्या तरुणाने पुण्यात सरेंडर न होता साताऱ्यात सरेंडर होण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी जारी केलेल्या व्हिडीओत त्याने शिंदे साहेबांचे नाव घेतले, हे शिंदे साहेब कोण असा सवाल पुणेकर विचारत आहेत. 

समस्त पुणेकरांना लाजवेल असे कृत्य शनिवारी सकाळी समोर आले होते. बड्या बापाच्या मुलाने लक्झरी गाडी रस्त्यावर मधोमध उभी करून सिग्नलवर लघुशंका केली होती. तसेच त्याला हटकणाऱ्यांना महिलांसमोर अश्लिल हावभाव करत पलायन केले होते. या माजलेल्या तरुणाने पुण्यात सरेंडर न होता साताऱ्यात सरेंडर होण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी जारी केलेल्या व्हिडीओत त्याने शिंदे साहेबांचे नाव घेतले, हे शिंदे साहेब कोण असा सवाल पुणेकर विचारत आहेत. 

हा मद्यधुंद तरुण गौरव आहुजा आहे, त्याचे आणि त्याच्या वडिलांची मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा आरोप आपचे नेते विजय कुंभार यांनी केला आहे. पोलिसांनी त्याचे वडील मनोज आहुजा यांना ताब्यात घेतले होते. यानंतर त्यांनी आपल्या मुलाने सिग्नलवर नाही तर माझ्या तोंडावर लघुशंका केली असे म्हटले होते. यावरही कुंभार यांनी मनोज आहुजांचे मगरीचे अश्रू असल्याची टीका केली आहे. 

या आहुजा घराण्याच्या तीन पिढ्यांनी बेकायदेशीर लॉटरी व्यवसायातून पैसा कमावलेला आहे. गौरववर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याचे वडील मगरीचे अश्रू ढाळत आहेत, तर या गुन्हेगार कुटुंबाबद्दल कोणाला सहानुभूती वाटली पाहिजे का? असा सवाल कुंभार यांनी केला आहे. 

मी गौरव आहुजा, माझ्याकडून आज सकाळी पुण्याच्या रस्त्यावर कृत्य घडलं. हे कृत्य खूप वाईट होतं. मी मनापासून माफी मागतो. संपूर्ण जनता आणि शिंदे साहेब यांची मनापासून माफी मागतो, असे आहुजाने व्हिडीओत म्हटले आहे.

आरोपी गौरव आहुजा हा फक्त देशाची, जनतेची माफी मागत नाहीय तर तो खासकरून शिंदे साहेबांचीही माफी मागत आहे. हे शिंदे साहेब नेमके कोण, त्यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे का, या शिंदे साहेबांनी आहुजाला वाचवण्यासाठी कोणती महत्त्वाची भूमिका बजावली आहे का, या प्रकरणात एखाद्या मोठ्या व्यक्तीचा हस्तक्षेप आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

रस्त्यावर लघुशंका करणारा गौरव आहुजा कोण?

फेब्रुवारी 2021 मधे गौरव ला तत्कालीन पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पथकाने  क्रिकेट बेटींगच्या गुन्ह्यात अटक केली होती. क्रिकेट बेटिंगमधे एक हाय प्रोफाइल रँकेट बस्ट करण्यात आले होते. त्यामध्ये गँगस्टर सचिन पोटेला मुख्य आरोपी करण्यात आले होते. या टोळीने कॉलेजच्या अनेक विद्यार्थ्यांना क्रिकेट बेटिंगमध्ये ओढल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. गौरव अहुजा , सुनिल मखीजा तसेच अजय शिंदे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोशल मिडिया सकाळपासून व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे गौरव आहुजा पुन्हा चर्चेत आला आहे.

टॅग्स :YerwadaयेरवडाPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी