शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

आयजीएम रुग्णालय सरकार चालविणार की नाही?

By admin | Updated: November 1, 2015 01:56 IST

इचलकरंजी येथील इंदिरा गांधी स्मारक रुग्णालय (आय. जी. एम) राज्य सरकारला हस्तांतरीत करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेतल्याची माहिती इचलकरंजी नगर परिषदेने

मुंबई : इचलकरंजी येथील इंदिरा गांधी स्मारक रुग्णालय (आय. जी. एम) राज्य सरकारला हस्तांतरीत करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेतल्याची माहिती इचलकरंजी नगर परिषदेने उच्च न्यायालयाला दिली. या निर्णयानुसार राज्य सरकारने रुग्णालय हस्तांतरीत करून घेण्यासाठी काय कार्यवाही केली आहे? अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीच्या वेळी या संदर्भातील माहिती सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. गेल्या सुनावणीच्या वेळी राज्य सरकारने रुग्णालय हस्तांतरणाबाबत उदासीनता दाखवली होती. ७४ व्या घटानात्मक दुरुस्तीप्रमाणे आरोग्यसेवा पुरवण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक संस्थांची आहे. त्यानुसार इचलकरंजी नगरपालिकेनेही त्यांच्या हद्दीतील नागरिकांना आरोग्यसेवा पुरवली पाहिजे, असे राज्य सरकारने खंडपीठाला सांगितले होते. तरीही खंडपीठाने रुग्णालय हस्तांतरणाबाबत इचलकरंजी नगरपालिका आणि राज्य सरकारला बैठक घेऊन या बैठकीचा इतिवृत्तांत सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नगराध्यक्षा, मुख्याधिकारी व नगरपरिषद संचालनालयाचे आयुक्त बैठकीत उपस्थित होते. सरकारला रुग्णालय हस्तांतरीत करण्याचा निर्णय नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला असून, तसा ठराव पारित झाल्याची माहिती सरकारी वकिलांनी खंडपीठाला दिली. रुग्णालय हस्तांतरणाचा प्रस्ताव राज्य सरकारपुढे सादर करण्यात आला असून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत या प्रस्तावर एक महिन्यात निर्णय घेण्यात येईल, अशीही माहिती सरकारी वकिलांनी खंडपीठाला दिली.त्यावर खंडपीठाने राज्य सरकार यावर काय निर्णय घेणार आहे, याची माहिती पुढील सुनावणीस देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले, तर राज्य सरकारने हस्तांतरीत करून घेण्यास नकार दिला, तर रुग्णालयाची परिस्थिती सुधारण्यासाठी काय उपाययोजना आखणार, याची माहिती पालिकेला देण्याचे निर्देशही दिले. (प्रतिनिधी) समस्यांमुळे जनहित याचिकेचा मार्गरुग्णालयात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने, रुग्णांना नीट उपचार मिळत नाहीत. या रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा नाही. इतकेच नव्हे, तर एक्सरे मशिन व अन्य अत्यावश्यक यंत्रेही नाहीत. त्यामुळे हे रुग्णालय नगर परिषदेच्या ताब्यात न ठेवता, राज्य सरकारनेच चालवावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते उमेश खांडेकर यांनी दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठापुढे होती.