शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

आता कुठे गेली मराठी फिल्म इंडस्ट्री? 'वरळी हिट अँड रन'प्रकरणी संजय राऊतांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 14:24 IST

अभिनेते जयवंत वाडकर हे वरळी हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेल्या कावेरी नाखवा या महिलेचे काका आहेत.

Sanjay Raut on Worli Hit and Run : वरळी हिट ॲण्ड रन प्रकरणात दोन दिवसांनी आरोपी मिहीर शाहला विरार येथून अटक करण्यात आली आहे. मिहीर हा शिवसेनेचे उपनेते आणि पालघर जिल्हाप्रमुख राजेश शाह यांचा मुलगा आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने मिहीरची आई आणि दोन मोठ्या बहिणींनाही ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकरणी विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य करताना, सरकारकडून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. 

मिहीरने वरळी कोळीवाड्यात राहणाऱ्या कावेरी नाखवा नावाच्या महिलेला रविवारी(दि.7) सकाळी 5.25 वाजता त्याच्या आलिशान कारने उडवले आणि सुमारे दोन किलोमीटर फरफटत नेले. या घटनेत कावेरी यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अभिनेते जयवंत वाडकर त्या महिलेचे सख्ये काका आहेत. मराठी इंडस्ट्रीतील सहकलाकाराच्या जवळच्या नातेवाईकाचा अशा पद्धतीने मृत्यू होतो, पण इंडस्ट्रीतून कुणी याबाबत काही बोलत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. 

काय म्हणाले संजय राऊत?याबाबत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणतात, 'राज्यातले सरकार गुन्हेगारांना पाठिशी घालत आहे. वरळी हिट अँड रन प्रकरणात हेच झाले. या मुलाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी मुंबई पोलिसांनी केली पाहिजे. हिट अँड रन प्रकरणात ज्या महिलेचा मृत्यू झाला, त्या मराठी अभिनेते जयवंत वाडकर यांच्या नातेवाईक आहेत. आता कुठे गेली मराठी इंडस्ट्री? एरव्ही आपले कमेंट्स देत असतात. त्यांनी यावर बोलले पाहिजे. कसला टाळकुटेपणा ही मराठी इंडस्ट्री करतेय? आपल्या मराठी इंडस्ट्रीतील एका सहकाऱ्याचे नातेवाईक अशाप्रकारे रस्त्यावर चिरडले गेले आहेत आणि तुम्ही मूक गिळून गप्प आहात,' अशा शब्दांत त्यांनी टीका मराठी सेलेब्रिटींवर टीका केली.

आरोपीला वाचविण्याचे प्रयत्नराऊत पुढे म्हणाले, हे प्रकरण साधे नाही, सरकारकडून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जसे पुणे प्रकरणात अग्रवाल फॅमिली आहे, तशीच इथे ही फॅमिली आहे. मुलाच्या बापाची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासा. पोलिसांकडे तो नसेल, तर आम्ही देऊ. कोणत्या अंडरवर्ल्डशी याचा संबंध आहे, तो काय करतो, त्याची प्रॉपर्टी किती आहे, एवढ्या मोठ्या कार कुठून येतात,  याचा तपास मुंबई पोलिसांनी करावा, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

हा मुख्यमंत्र्यांचा खास माणूसहा मुख्यमंत्र्यांचा खास माणूस कसा झाला. याचा संबंध अंडरवर्ल्ड गँगशी आहे. बोरिवली पोलीस ठाण्यात जाऊन त्याचा रेकॉर्ड तपासा. मुंबई पोलीस आयुक्तांना आवाहन करतो की, त्याचा रेकॉर्ड समोर आणा. एकनाथ शिंदेंसोबत कोणत्या प्रकारची लोक बसली आहेत हे कळेल. कार चालवणारा आरोपी ड्रग्जच्या नशेत होता आणि ही नशा मेडिकल रिपोर्टमध्ये येऊ नये, यासाठी तीन दिवसांसाठी त्याला फरार केले आणि नंतर अटक करण्यात आली, असा आरोपही संजय राऊतांनी केला आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSanjay Rathodसंजय राठोडworli-acवरळीAccidentअपघातjaywant wadkarजयवंत वाडकरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे