शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘शॉपिंग मॉल’ना कधी येणार जाग?

By admin | Updated: September 18, 2014 00:48 IST

दहशतवादी संघटना अल कायदाने भारताला ‘टार्गेट’ करण्याची धमकी दिल्यानंतर केंद्र सरकारकडून निरनिराळ्या शहरांत सुरक्षा व्यवस्था वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दहशतवाद्यांचे ‘सॉफ्ट टार्गेट’

सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा : दहशतवाद्यांचे ‘सॉफ्ट टार्गेट’ ठरण्याची भीतीअलशार खान - नागपूरदहशतवादी संघटना अल कायदाने भारताला ‘टार्गेट’ करण्याची धमकी दिल्यानंतर केंद्र सरकारकडून निरनिराळ्या शहरांत सुरक्षा व्यवस्था वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दहशतवाद्यांचे ‘सॉफ्ट टार्गेट’ ठरू शकतील अशा जागांवर तर कडक बंदोबस्त राहणे अपेक्षित आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात नागपुरातील निरनिराळे शॉपिंग मॉल्स, मल्टिप्लेक्स यांची पाहणी केली असता अनेक ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्थाच नसल्याचे आढळून आले. जसवंत तुली मॉल, कामठी मार्गया मॉलमध्ये सुरक्षा व्यवस्था फारशी मजबूत नाही व त्यामुळे कुणीही येथे सहजपणे प्रवेश करु शकतो. येणाऱ्या व्यक्तीची एकदाही तपासणी होत नाही. शिवाय मेटल डिटेक्टर वगैरेदेखील येथे नाही. परंतु या मॉलच्या आतमध्ये असलेल्या ‘मल्टिप्लेक्स थिएटर’मध्ये मात्र खासगी सुरक्षा एजन्सीला कंत्राट देण्यात आले आहे. येथे मोठ्या प्रमाणावर तपासणी यंत्रणा असून सुरक्षा रक्षक उपस्थित असतात. येथील सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ‘एटीएस’च्या (अ‍ॅन्टी टेररिस्ट स्क्वॉड)निर्देशांप्रमाणे १० हून अधिक ‘सीसीटीव्ही’ लवकरच लावण्यात येणार असल्याची माहिती ‘मॉल’चे व्यवस्थापक शंकर सोनकवर यांनी दिलीइटर्निटी मॉल, व्हेरायटी चौकयेथे सुरक्षा व्यवस्थेकडे लक्ष देण्यात आले आहे. दोन्ही प्रवेशद्वार व बाहेर निघण्याच्या ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था आहे. या ठिकाणी ४० च्या आसपास सुरक्षा तसेच सफाई कर्मचारी उपस्थित असतात. शिवाय ‘मॉल’मध्ये प्रवेश करणाऱ्यांची तपासणी होते. सोबतच वाहनांची ‘पार्किंग’च्या अगोदर तपासणी होती. परंतु ‘मॉल’च्या पायऱ्यांवर बऱ्याच वेळा गर्दी असते व तेथे नेमके कोण बसले आहे हे तपासण्याची यंत्रणा अस्तित्वात नाही.सेंट्रल मॉल, धरमपेठया ‘मॉल’च्या दोन्ही प्रवेशद्वारांवर योग्य सुरक्षा व्यवस्था अस्तित्वात नाही. ‘मेटल फ्रेम्स ’ व ‘मेटल डिटेक्टर’ येथे लावण्यात आले आहेत, परंतु याला टाळून अनेकजण आत प्रवेश करताना दिसून येतात. येथील तिन्ही मजल्यांवर अशीच स्थिती आहे. शिवाय ‘पार्किंग’मध्ये वाहनांची तपासणी होत नाही. येथील प्रशासन सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी मान्य करायला तयारच नाही. यासंदर्भात ‘मॉल’च्या व्यवस्थापनाचे सदस्य सुमित फ्रान्सिस यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी गैरवर्तन केले.एम्प्रेस मॉल, कॉटन मार्केटहा शहरातील सर्वात मोठा ‘शॉपिंग मॉल’ आहे. येथे सुरक्षा व्यवस्था तर आहे परंतु त्यात सुधारणेला बराच वाव आहे. येथे जवळपास ३० सुरक्षारक्षक असून ३ डझनांहून अधिक सीसीटीव्हीच्या माध्यमातून ‘मॉल’वर लक्ष ठेवण्यात येते. मुख्य प्रवेशद्वारावर येणाऱ्यांची तपासणी केली जाते. परंतु ‘पार्किंग’कडून येणाऱ्या मार्गावर तपासणीची व्यवस्था नाही. सोबतच ‘पार्किंग’मध्ये गाड्यांची तपासणी होत नाही. समोरच्या ‘पार्किंग लॉट’मध्येदेखील असेच चित्र आहे.