शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

धरणातले पाणी संपल्यावर पालिकेस आली जाग

By admin | Updated: June 4, 2014 22:30 IST

खडकवासला प्रकल्पात जुलै अखेर पर्यंतचा पाणीसाठा उरला असताना, आता महापालिकेने या पाण्याचे 31 ऑगस्ट पर्यंत करण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला प्रकल्पात जुलै अखेर पर्यंतचा पाणीसाठा उरला असताना, आता महापालिकेने या पाण्याचे 31 ऑगस्ट पर्यंत करण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. त्यामुळे पुणेकरांवर ऐन पावसाळयात पाणी संकट ओढावणार आहे. शहरास दररोज लागणारे पाणी पाहता या प्रकल्पात सुमारे साडेचार टीएमसी पाणी आवश्यक असताना, प्रत्यक्षात धरणात मात्र तीनच टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन झाल्यास पाणी कपात अटळ बनली आहे.शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकलवासला प्रकल्पातील धरणांमधून महापालिकेस दरमहा दिड टीएमसी पाणी दिले जाते. त्यानुसार, संपूर्ण वर्षभरात पालिकेस 14 ते 15 टीएमसी पाण्याचा पुरवठा केला जातो. मागील वर्षी या प्रकल्पातील खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या धरणात सुमारे 100 टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे गेली दिड वर्षापासून सुरू असलेली पाणी कपात मागे घेण्यात आली. मात्र, त्यानंतर गेल्या तीन महिन्यात या प्रकल्पातून तब्बल 10 टीएमसी पाणी शेती आणि शहरासाठी सोडण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पातील पाण्याची पातळी आणखीनच खालावली असून पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज अखेर या प्रकल्पात केवळ 2. 91 टीएमसी पाणी आहे. हे सर्व पाणी महापालिकेच्या पाणी पुरवठयासाठी 15 जुलै पर्यंत राखीव ठेवण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, गेले दोन महिने शेतीसाठी कालव्याद्वारे मोठया प्रमाणात पाणी सोडले जात आहे. तसेच कालवाही 1473 क्युसेक्सने सुरूच आहे. या वर्षी कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच गेल्या काही वर्षांची आकडेवारी पाहता धरणे भरण्यास ऑगस्टचा शेवटचा आठवडा उजाडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या वर्षी पाटबंधारे विभागाने 31 ऑगस्ट पर्यंत पाणीसाठा राखीव ठेवण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. मात्र, त्यास आम्ही पाणी देऊ असे मोघम उत्तर या विभागाकडून देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शहरास दरमहा लागणा-या दिड टीएमसी पाण्याची मागणी पाहता महापालिकेच्या मागणीनुसार, 31 ऑगस्ट पर्यंत पाणीसाठयाचे नियोजन करावयाचे असल्यास धरणात साडेचार टीएमसी पाणी असणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात पाऊने तीन टीएमसीच पणी आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करावयाचे झाल्यास जादा पाणी नसल्याने आहे तेच पाणी कपातीद्वारे वाचवावे लागणार आहे.