शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ‘त्या’ शिक्षकांना वेतन कधी?

By admin | Updated: October 20, 2015 01:43 IST

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. वारंवार आश्वासन देणारे शासन आश्वासनांची पूर्तता करत

मुंबई : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. वारंवार आश्वासन देणारे शासन आश्वासनांची पूर्तता करत नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केल्याचे मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने सांगितले.२००३ ते २०१०-११ पर्यंतच्या एक हजार मंजूर पदांना एप्रिल २०१५ पर्यंत वेतन देण्याचा निर्णय घेतला. त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी संघटनेचे सरचिटणीस अनिल देशमुख यांनी यावेळी केली. ते म्हणाले की, पदांना मंजूरी मिळालेले शिक्षक गेल्या पाच ते १२ वर्षांपासून विनावेतन काम करत आहेत. त्यांची परिस्थिती वेठ बिगारापेक्षा गंभीर असून शासन अत्यंत असंवेदनशीलतेने वागत आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी या मंजूर पदांचे वेतन सुरू करावी.शिवाय कनिष्ठ महाविद्यालय संघटनेच्या शिक्षकांनी मार्च २०१५ मध्ये पेपर तपासणीबाबत असहकार आंदोलन केले होते. त्या पार्श्वभूमीवर ७ मार्च, १३ मार्च, १३ जुलै व २ सप्टेंबर रोजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांसोबत झालेल्या बैठकीत काही मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. शिवाय काही मागण्यांवर १५ आॅगस्टपर्यंत कार्यवाही करण्याचे आश्वासनही शिक्षणमंत्र्यांनी दिले होते. मात्र दिलेले आश्वासन हवेत विरले असून नव्या समस्या निर्माण झाल्याचे संघटनेने सांगितले. (प्रतिनिधी)संच मान्यतेमधील त्रुटी दूर कराआॅनलाईन संच मान्यतेमध्ये अनेक त्रुटी असून शिक्षकांनी त्याला विरोध केला आहे. आॅनलाईनच्या सॉफ्टवेअरमध्ये काही त्रुटी असून त्यामुळे शेकडो अनुदानित तुकड्या बंद होण्याची शक्यता संघटनेने व्यक्त केली. तसे झाल्यास लाखो विद्यार्थी अनुदानित शिक्षणापासून वंचित होऊन हजारो शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीतीही संघटनेने व्यक्त केली. परिणामी आॅनलाईन सॉफ्टवेअरमधील त्रुटी दूर केल्यास शिक्षकांचा संच मान्यतेला विरोध नसेल, असेही संघटनेने स्पष्ट केले.दिवाळीनंतर बेमुदत बंदधरणे आंदोलनातून सरकारला इशारा देण्यात आला असून पुढील आठवड्यात राज्यस्तरीय बैठक आयोजित केल्याचे देशमुख यांनी सांगितले. दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्याने मोर्चा आणि निदर्शनाच्या माध्यमातून शिक्षक रोष व्यक्त करतील. मात्र त्यानंतरही शासनाने मागण्यांची दखल घेतली नाही, तर बेमुदत बंद पुकारण्याची घोषणाही करण्याचा शिक्षकांचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.शिक्षकांच्या प्रमुख प्रलंबित मागण्या२०११-१२ पासूनच्या वाढीव पदांना मंजुरी द्या.माहिती तंत्रज्ञान विषय अनुदानित करा.२०१२-१३ मधील नियुक्त शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून नियुक्ती मान्यता व वेतन द्या.